बीड : वृत्तसंस्था
राज्यातील बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे काही फोटो सोमवारी समोर आले. यानंतर आज मनोज जरागे पाटील यांनी मस्साजोगमध्ये जात देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी धनंजय देशमुख मनोज जरांगे यांच्यासमोर ढसाढासा रडले.
धनंजय देशमुख म्हणाले की, माझ्या भावाला किती वेदना झाल्या असतील. मला आता वेदना सहत नाहीत, मला आई समोर बसल्याने, मुलं सोबत असल्याने मला रडताही येत नाही. मला भावाला वाचवता आले नाही, अशी खंत त्यांनी यावेळी मनोज जरांगे यांच्याकडे व्यक्त केली.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, धनंजय मुंडेंना आमदारकीसकट मंत्रिपदावरुन उचलून फेका असे जरांगे यांनी म्हटले आहे. ही टोळी राज्यातून संपवावी लागेल असेही त्यांनी म्हटले आहे. धनंजय मुंडेंवर 302 अंतर्गत गुन्हा दाखल करा. तसेच, हत्या प्रकरणाचा बदला घेतला जाणार, अशा शब्दांत जरांगेंकडून धनंजय देशमुखांचे सांत्वन करण्यात आले.
मनोज जरांगे म्हणाले की, संतोष देशमुख कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे ही जबाबदारी आपली आहे. आपल्या हातात तेवढी एकच गोष्ट आहे की, येऊ द्या त्यांना सुटून जसे यायचे तसे येऊद्या संतोष देशमुख यांच्या हत्येचा बदला घेणंच आपल्या हातात आहे. हे खूप भयंकर कृत्य आहे. इतका राग का? चूक काही मोठी नव्हती. देशात कुठेच अशी हत्या झाली नाही. इतका रोष व्यक्त करण्याइतकं काहीच झाले नव्हते.
मनोज जरांगे म्हणाले की, या सर्व गोष्टीला धनंजय मुंडे जबाबदार आहे. त्याला यांचा पैसा गोड लागला. मग या लोकांनी जमीनी बळकावल्या लोकांना मारहाण केली. त्यांने मंत्रिपदाचा वापर यांच्यासाठी केले आहे. इतके तिरस्कारने भरलेले सरकार मी बघीतले नाही. पुरावे नाही म्हणता तुम्हाला लाज वाटेल. धनंजय मुंडे 302 मध्ये आरोपी झाला पाहिजे. तरच हे सरकार खानदानी सरकार आहे. यांना पैसा, पदे मिळवण्यासाठी हे कोणत्याही टोकाला जाऊ शकतात. ही विकृती पहिल्यापासून अशीच आहे. मी खूप कठोर काळजाचा आहे, पण कालचे फोटो पाहिल्यानंतर कुणीही खचून जाईल. धनंजय देशमुख यांना घरात जावे लागेल, बाहेर यावे लागेल. याचा बिमोड आपल्याला करायचा आहे, तुम्हाला लढावे लागेल. हे आपल्या लेकरांवर हसले आता त्यांना बाहेर सुटून येऊ द्या मग जनतेला न्याय करावा लागेल. मनोज जरांगे म्हणाले की, काल फोटो पाहिल्यानंतर मला रात्रभर झोप लागली नाही. मी तफफड करत होता. माझा संतोष देशमुख हसला पाहिजे, की माझ्या माघारी माझ्या मराठा पोरांनी बदला घेतला. आता बदला होणार.सर्व टोळीचा बिमोड करत बदला घेणार आहोत.