ध्यास विश्वसार्ह बातमीचा

काँग्रेस कार्यकर्त्यांची कोणतेही कामे थांबू नका अन्यथा ; खा.प्रणिती शिंदे संतापल्या !

सोलापूर : प्रतिनिधी

राज्यात महायुतीचे सरकार असून गेल्या काही दिवसाआधी महायुतीमधील एका नेत्यांने विरोधी पक्षाच्या सरपंचांला देखील निधी देणार नाही असे वक्तव्य केल्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर आता सोलापूर येथे काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवारी सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये खासदार निधी आणि जिल्हा नियोजन समितीच्या कामांचा आढावा घेतला. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, काँग्रेसचे नेते सुरेश हसापुरे, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्यासह काँग्रेसचे तालुकाध्यक्ष या बैठकीला उपस्थित होते.

या बैठकीत खासदार शिंदे यांनी खासदार फंड आणि जिल्हा परिषदेच्या विविध निधीचा आढावा घेतला. जिल्हा परिषदेतून काम वाटत होता त्याचे 60 / 40 असे प्रमाण ठेवण्याच्या सूचना केल्या. सोलापूर लोकसभा विधानसभा मतदारसंघातील काही भाजपचे आमदार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची कामे अडवतात त्यात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष घालावे, खासदार निधी आणि आमदारांच्या निधीचा काय संबंध असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. काँग्रेस कार्यकर्त्यांची कोणतेही कामे थांबू नका अन्यथा मला विभागीय चौकशी लावण्यास भाग पाडू नये अशी ही कठोर भूमिका खासदार प्रणिती शिंदे यांनी या बैठकीत मांडली.

या बैठकीत अनेक विषयांवर सिद्धाराम म्हेत्रे व सुरेश हसापुरे यांनी प्रश्न उपस्थित करीत त्याची सोडवणूक करण्याची मागणी केली. अक्कलकोट आणि मंगळवेढा या दोन तालुक्यात भाजपच्या आमदारांनी जिल्हा नियोजन समितीतून काही कामे थांबवली आहेत, त्याच विषयावर सर्वाधिक चर्चा झाल्याची माहिती मिळाली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!