मुंबई : वृत्तसंस्था
पुणे शहरातील स्वारगेट बसस्थानकावर महिलेवर झालेल्या बलात्काराची घटना ताजी असतानाच आता मुंबईच्या जोगेश्वरी परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडल्याचे समोर आली आहे. पोलिसांनी 5 जणांना बेड्या ठोकल्या असून अधिक तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 24 फेब्रुवारीला शाळा सुटल्यापासून ती बेपत्ता होती. 26 फेब्रुवारीला मुलीच्या काकांनी मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार पोलिसात केली. त्यानंतर 27 तारखेच्या सकाळी ही पीडिता दादर रेल्वे स्थानकाजवळ आढळली. रेल्वे पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. पीडित मुलगी तिच्या काकांसोबत राहते. 24 फेब्रुवारी रोजी शाळा सुटल्यानंतर ती बेपत्ता झाली होती. 24 फेब्रुवारीच्या दिवशी ती बेपत्ता झाली होती. अटक करण्यात आलेले आरोपी हे एसी मेकॅनिक आहेत. शाळा सुटल्यानंतर मुलगी एकटी असल्याचे बघून आरोपी तिला जोगेश्वरीतील संजय नगर भागातील घरी घेऊन गेले आणि त्यानंतर या नराधमांनी मुलीवर आळीपाळीने बलात्कार केला. त्यानंतर 27 फेब्रुवारीला पीडित मुलगी रेल्वे पोलिसांना दादर स्थानकात सैरभैर अवस्थेत सापडली. रेल्वे पोलिसांनी तिला जोगेश्वरी पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांच्या चौकशीत तिच्यावर जोगेश्वरी परिसरात लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती मिळाली. यावरून पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिस अधिक सुरू आहे.
तपासाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पाचही आरोपी अनोळखी असल्याचा दावा विद्यार्थिनीने केला आहे. तिच्या शरीरावर जखमा आढळलेल्या नाहीत. दुसरीकडे दादर रेल्वे पोलिसांनी नोंदवलेल्या जबाबात विद्यार्थिनीने लैंगिक अत्याचाराबद्दल उल्लेख केला नव्हता, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने स्पष्ट केले.