ध्यास विश्वसार्ह बातमीचा

चांदीने घेतली माघार तर सोन्याच्या दरात मोठी मुसंडी !

मुंबई : वृत्तसंस्था

गेल्या काही दिवसापासून राज्यात सोन्यासह चांदीच्या दागिन्याचे दर कमी अधिक प्रमाणात होत असतांना या आठवड्यात सोन्याने सुरुवातीला मोठी मुसंडी मारली. तर चांदीने माघार घेतली होती. दोन दिवसात सोन्याने धुमाकूळ घातला. त्यामुळे एसीमध्ये सुद्धा ग्राहकांना घाम फुटला होता. तर बुधवारी मात्र सोन्यात पडझड झाली. चांदीने मात्र झेप घेतली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणाचा धसका सध्या जगाने घेतला आहे. त्याचा परिणाम सराफा बाजारावर सुद्धा दिसून येण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात सोने 1200 रुपयांनी स्वस्त झाले होते. तर चांदी 5 हजारांनी स्वस्त झाली होती. दोन दिवसात सोने 1200 रुपयांहून अधिकने वाढल्या.

या आठवड्यात सोमवारी सोने 760 रुपयांनी तर मंगळवारी 600 रुपयांनी महागले होते. तर बुधवारी सोने 490 रुपयांनी उतरले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 80,350 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 87,640 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. मागील आठवड्यात चांदी 5 हजारांनी रुपयांनी उतरली होती. तर या सोमवारी चांदी 1,000 रुपयांनी वधारली. तर मंगळवारी किंमतीत बदल दिसला नाही. बुधवारी चांदी पुन्हा एक हजारांनी वधारली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 99,000 रुपये इतका आहे.

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 85,876, 23 कॅरेट 85,532, 22 कॅरेट सोने 78,662 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 64,407 रुपये, 14 कॅरेट सोने 50238 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 96,460 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!