---Advertisement---

बाजार समितीच्या निवडणुकीसाठी दिग्गज नेते आले एकत्र !

By team
On: April 14, 2025 4:50 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

राज्यातील अनेक जिल्ह्यात स्थानिक निवडणुकीची लगबग सुरु झाली आहे त्यामुळे सर्वच नेत्यांनी आता बैठकीचा सपाटा सुरु केले असतांना आता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार दिलीप माने, काँग्रेसचे नेते सुरेश हसापुरे, शहाजी पवार, राजशेखर शिवदारे, बाळासाहेब शेळके, अविनाश महागावकर, श्रीशैल नरोळे, हरीश पाटील हे सर्व नेते एकत्रित आले आहेत. यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांची उपस्थिती होती.

सोमवारी शासकीय विश्रामगृहावर एकत्रित येऊन पत्रकार परिषद घेऊन केली. आमदार कल्याणशेट्टी यांनी ही निवडणूक आम्ही सर्वत्र एकत्र येऊन लढविणार असल्याचे घोषित केले. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अंतिम निर्णय घेतील. 16 एप्रिल रोजी आमच्या पॅनल ची घोषणा होईल असेही ते म्हणाले. आमदार सुभाष देशमुख यांच्याशी चर्चा झाली आहे, मतदारसंघाची राजकीय परिस्थिती वेगळी आहे त्यामुळे एकत्र येण्याशिवाय पर्याय दिसत नाही असे आमचे मत आहे. बापू सोबत यावेत ही इच्छा आहे त्यांनी यावे असे मी आवाहन करतो.

दिलीप माने म्हणाले, आम्ही सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक करतोय, बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करतोय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आम्हाला गरज आहे म्हणून हा निर्णय घेतला.

सुरेश हसापुरे म्हणाले, गेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत विजयकुमार देशमुख होतेच ना. डी सी सी बँक, मार्केट कमिटी या निवडणुका पक्षीय सोडून लढवल्या जातात म्हणून आम्ही एकत्र आलोय.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!