---Advertisement---

श्री. गहिनीनाथ महाराज औसेकर यांना शनिरत्न पुरस्कार जाहीर

By team
On: May 2, 2025 4:44 PM
Follow Us:
---Advertisement---

औसा : प्रतिनिधी

श्रीनाथ संस्थानचे सद्गुरु तथा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान समितीचे सहअध्यक्ष श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांना 2025 चा शनिरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. नाथ संस्थान मध्ये आज श्री शनेश्वर देवस्थान शनिशिंगणापूरचे अध्यक्ष श्री भागवत सोपानराव पाटील बानकर श्री अतुल जी पाटील महाराज आणि विश्वस्त मंडळाच्या मान्यवर पदाधिकाऱ्यांनी सद्गुरु गहिनीनाथ महाराज यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पुरस्कार स्वीकृतिबाबतचे पत्र उचित सन्मान करून प्रदान केले व 27 मे रोजी श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथे उपस्थित राहून हा पुरस्कार (award) स्वीकारण्याचे निमंत्रण दिले.

श्री शनेश्वर देवस्थान शनिशिंगणापूर संस्थान तर्फे 2004 पासून प्रतिवर्षी हा शनि रत्न पुरस्कार महाराष्ट्रातील ख्यातनाम संत महंत सामाजिक धार्मिक व पत्रकारिता क्षेत्रातील दिग्गज व्यक्तीत्वांना देण्यात आलेला आहे यावर्षी 2025 च्या शनि रत्न पुरस्कारासाठी नाथ संस्थानचे श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांची सन्मानपूर्वक निवड घोषित करण्यात आली आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल नाथ संस्थानच्या सर्व शिष्य भक्त परिवार आणि वारकऱ्यात आनंद व्यक्त होताना दिसत आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!