---Advertisement---

सावधान : बाजारात विक्रीला आले बनावट आंबे !

By team
On: May 5, 2025 4:17 PM
Follow Us:
---Advertisement---

पुणे : वृत्तसंस्था

राज्यात सध्या सर्वत्र उन्हाळा सुरु असून बाजारात अनेक प्रकारचे आंबे विक्रीस आले आहे तर राज्यातील इंदापूर शहर हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे, संपूर्ण तालुक्यातील नागरिकांची वर्दळ लहान मोठ्या वस्तू खरेदीसाठी इंदापूरला असते. त्यातच आंब्याचा सीजन असल्यामुळे ग्राहक चवीने आंबा खरेदी करतात. मात्र, इंदापूर पंचायत समितीच्या समोर, राजरोसपणे बनावट आंबे आणून ग्राहकांच्या माती मारले जात आहेत.

साडेतीनशे ते पाचशे, सहाशे रुपये डजनाचे पेटीचे दर घेतले जातात. मात्र, घरी गेल्यावर हेच आंबे आतून खराब निघत आहेत. त्यामुळे मोठा ग्राहकांना पश्चाताप सहन करावा लागत आहे. येथून पुढच्या काळात आंबे खरेदी करताना सावधान पद्धतीने खरेदी करावेत, अशी चर्चा इंदापूरात रंगली आहे. इंदापूर शहरात परप्रांतीय तसेच काही स्थानिक व्यापारी आंबे विक्री करत आहेत. मात्र हे आंबे नैसर्गिक रित्या पिकवले आहेत का? ओरिजनल आंब्यांची विक्री होते का? हे तपासणारी यंत्रणा मात्र, अध्याप इंदापूर शहरात फिरलेली दिसत नाही. राज्यभर आंब्याचे दर कमी झालेले असताना, इंदापुरात दरात मात्र वरचढपणा, तर गुणवत्ता शून्य अशी परिस्थिती यंदाच्या आंबे विक्रेत्यांकडून दिसत आहे.

पैसे घ्या मात्र चांगले आंबे द्या, अशी अपेक्षा ग्राहकांना आहे. मात्र वेगवेगळी केमिकल वापरून आंब्याला रंग आणला जातोय, ना गुणवत्ता, ना चव,यामुळे ग्राहक हैराण झाले आहेत. एका ग्राहकाने शनिवारी (ता. ३) साडेतीनशे रुपये डझनाने आंब्याची पेटी खरेदी केली. यामध्ये तब्बल तीन ते चार आंबे आतून काळे झालेले बाद निघाले. कोणताही ग्राहक आपल्या कुटुंबाला एक चांगला खाऊ निर्माण होवा, यासाठी कोणतीही फळे खरेदी करतात. फळे ओरिजनल विकावीत, पैसे कमवावेत याबद्दल कोणतीही हरकत नाही.

मात्र बोगस फळे विक्री करून सामान्य माणसाच्या जीविताशी, आरोग्याशी, अशा बोगस विक्रेत्यांनी खेळ करू नये. अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या संदर्भात अन्न प्रशासन विभागाने व संबंधित विभागाने बोगस आंबा विक्री करणाऱ्यांवर, धाडी टाकून, त्यांना जेलची हवा खाण्यास लावावी. बोगस आंबा विक्रेत्यांची त्यांच्या फळांची चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!