ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट तालुक्याचा बारावीचा निकाल ६६.४३ टक्के

निकालात मोठी घसरण ; पालकांनी व्यक्त केली चिंता

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यात अक्कलकोट तालुक्याचा निकाल ६६.४३ टक्के इतका लागला आहे.या निकालाचा एकूण विचार केला तर गतवर्षीच्या तुलनेत टक्केवारी मोठ्या प्रमाणात घसरली आहे. त्यामुळे पालकांतून देखील चिंता व्यक्त केली गेली .गेल्या वर्षी याच परीक्षेचा निकाल ९३.४३ टक्के इतका लागला होता.

या परीक्षेला तालुक्यातून विविध शाळा व महाविद्यालयातून एकूण २ हजार ७०७ विदयार्थीपैकी २ हजार ६७८ विद्यार्थी परीक्षेस बसली होती. त्यात २५ विषेश प्राविण्य,२१६ प्रथम श्रेणी,८३४ द्वितीय श्रेणी तर उर्वरित ७०४ विद्यार्थी केवळ उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत एकूण १ हजार ७७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेली काही दिवसांपासून निकालाच्या अनधिकृत तारखा सोशल मिडियावर झळकत होत्या पण नेमकी तारीख जाहीर होत नव्हती.पण मंडळाने काल अचानकपणे अधिकृतपणे तारीख जाहीर केली आणि आज दुपारी निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला.आज अधिकृतपणे मंडळाच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थी व पालकांतून समाधान व्यक्त होत आहे.तालुक्यातील विविध उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल याप्रमाणे. सी.बी.खेडगी कॉलेज अक्कलकोट ७३.६२ टक्के,मंगरूळे ज्युनिअर कॉलेज ६४.१५ टक्के,श्री बसवराज उच्च माध्यमिक प्रशाला, करजगी ७३.९१ टक्के,ग्रामीण विद्या विकास ज्युनिअर कॉलेज, चपळगाव ३२.०७ टक्के,अलहज जैनबी शाब्दी उर्दू ज्युनिअर कॉलेज,मैंदर्गी ८०.७२ टक्के,सिद्धरामेश्वर उच्च माध्यमिक प्रशाला, तोळणुर ३८.७० टक्के,धोंडूबाई स्वामी प्रशाला, चुंगी ९.६७ टक्के,जयशंकर हायस्कुल अँड ज्युनिअर कॉलेज, तडवळ ७१.४२ टक्के,एच.जी प्रचंडे उच्च माध्यमिक प्रशाला ,नागणसुर ६०.५२ टक्के, सिद्धाराम म्हेत्रे ज्युनियर कॉलेज , स्टेशन रोड अक्कलकोट ५५.५५ टक्के, शिवचलेश्वर महाविद्यालय मैंदर्गी, ६२.१० टक्के,एस.एस.म्हेत्रे ज्युनिअर आश्रम महाविद्यालय रुद्देवाडी ५६.५६ टक्के,कै.परशुराम जाधव ज्युनिअर कॉलेज कोन्हाळी ६६.२९ टक्के,के.एस. एम.ज्युनिअर कॉलेज, नागनहळ्ळी ६८.६८ टक्के,मल्लिकार्जुन उच्च माध्यमिक विद्यालय ,केगांव बु ५८.५३ टक्के,श्री गुरुशांतलिंगेश्वर महाविद्यालय,
दुधनी ६४.५६ टक्के,कै.हरिश्चंद्र राठोड ज्युनिअर कॉलेज, कडबगांव ५७.२८ टक्के,एस.एस. शेळके प्रशाला अँड ज्युनिअर कॉलेज,वागदरी ५८.६९ टक्के, आनंद चैतन्य जुनिअर कॉलेज,हन्नूर ४३.७५ टक्के,मातोश्री गुरुशांतवा कल्याणशेट्टी उच्च माध्यमिक प्रशाला,अक्कलकोट ८४.५४ टक्के, जे.पी हायस्कूल गौडगाव बुद्रुक ७५.९२ टक्के, श्री काशिविश्वेश्वर उच्च माध्यमिक प्रशाला,जेऊर ७१.८७ टक्के,काशीराया काका पाटील ज्युनिअर कॉलेज,अक्कलकोट ४० टक्के,इंडियन मॉडेल ज्युनिअर कॉलेज,अक्कलकोट ९७.६७ टक्के,एस.बी खेडगी होकेशनल कॉलेज, अक्कलकोट ६५.९३ टक्के,ग्रामीण विद्याविकास ज्युनिअर कॉलेज,चपळगाव ३७.५० टक्के,श्री बसवराज माध्यमिक आणि उच्च माध्यमिक व्होकेशनल महाविद्यालय, करजगी ५३.८४ टक्के लागला आहे.

अक्कलकोटमध्ये एकही निकाल शंभर टक्के नाही

गेल्या वर्षीच्या निकालामध्ये चार महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला होता. यावर्षी मात्र एकही महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला नाही.कॉपीमुक्त परीक्षा अभियानाचा फटका विद्यार्थ्यांना बसल्याची चर्चा निकालानंतर सर्वत्र सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!