---Advertisement---

दहावीचा निकाल : अक्कलकोट तालुक्याचा निकाल ८५.८८ टक्के

By team
On: May 13, 2025 6:11 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट  : तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून यात अक्कलकोट तालुक्याचा निकाल ८५.८८ टक्के इतका लागला आहे.

गतवर्षीच्या तुलनेत हा निकाल दहा टक्क्यांनी घटला आहे.यावर्षी तालुक्यातून४ हजार १७२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.त्यापैकी ३ हजार ५८३ विद्यार्थी – विद्यार्थिनी उत्तीर्ण झाले आहेत. ५६६ विशेष प्राविण्य, प्रथम श्रेणीमध्ये ९१५, द्वितीय श्रेणीमध्ये १ हजार ३०३ तर उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या ७९९ इतकी राहिली आहे. दरवर्षीप्रमाणे निकालाच्या तारखेचा घोळ सोशल मीडियावर सुरूच होता पण सोमवारी अचानकपणे मंडळांने तारीख जाहीर केली आणि
निकालाची उत्सुकताच संपविली.

शाळांचा निकाल याप्रमाणेे :- श्री शहाजी हायस्कूल अक्कलकोट : ८३.९० टक्के, मंगरूळे प्रशाला अक्कलकोट: ९६.९१ टक्के , ग्रामीण विद्या विकास विद्यालय चपळगांव : ८१.४२ टक्के, श्री बसवराज हायस्कूल करजगी : ८४ ८४ टक्के, श्री शिवचलेश्वर हायस्कूल मैंदर्गी : ८६.१३टक्के, श्री एस.जी.परमशेट्टी हायस्कूल दुधनी : ८४.८१ टक्के , नूतन विद्यालय पान मंगरूळ : ९७.२४ टक्के, श्री एस.एस.शेळके प्रशाला वागदरी : ८४.२४ टक्के, अँग्लो उर्दू हायस्कूल स्टेशन रोड अक्कलकोट : ९६.७२ टक्के,एम.एम.श्री राणी निर्मालाराजे कन्या प्रशाला अक्कलकोट : ९७.७७ टक्के, सिद्धरामेश्वर हायस्कूल तोळणूर : ७८.८४ टक्के, श्रीमती धोंडूबाई स्वामी प्रशाला चुंगी : ९२.३० टक्के, श्री काशिविश्वेश्वर हायस्कूल जेऊर : ८२ ७३ टक्के, एच.जी प्रचंडे हायस्कूल नागणसुर : ८०.८६ टक्के, श्री मल्लिकार्जुन विद्याविकास प्रशाला किणी : ७८.०४ टक्के, ज्ञानगंगा प्रशाला दहिटणे: ८० टक्के, जयशंकर प्रशाला तडवळ : ७६.५९ टक्के, पोस्ट बेसिक हायस्कूल कोन्हाळी : ४२.८५ टक्के,शाब्दी उर्दू हायस्कूल मैंदर्गी : ९८.०३ टक्के, नागनाथ विद्या विकास प्रशाला कुरनुर : ८६.२० टक्के, श्री पंचलिंगेश्वर हायस्कूल शिरवळ : ७४.४१ टक्के , पोस्ट बेसिक आश्रम शाळा बोरोटी : ९४.४४ टक्के,अनंत चैतन्य प्रशाला हन्नुर : ८५.४८ टक्के , नवयुग विद्यालय बादोले : ७६.७४ टक्के, उडगी प्रशाला उडगी : ८३.१५ टक्के, श्री सिद्धेश्वर हायस्कूल सलगर : ९०.९० टक्के, शंकरराव शरणप्पा अष्टे प्रशाला भुरीकवठे : ९२.५० टक्के, श्री जे पी हायस्कूल गौडगाव बुद्रुक : ८८.८० टक्के,
श्री कमलेश्वर प्रशाला सुलेरजवळगे : ९३.५४ टक्के, काशिराया काका पाटील विद्यालय अक्कलकोट : ७२.२२ टक्के, श्री कुमारेश्वर विद्यालय शावळ : ८०.७० टक्के, सौ. सुरेखा कल्याणशेट्टी हायस्कूल अक्कलकोट : ९२.२२ टक्के,हैद्रा प्रशाला हैद्रा : ९३.१० टक्के, श्री शंकरराव विरसंगप्पा भावी विद्यालय गुड्डेवाडी : ७५.७५ टक्के, श्री महांतेश्वर प्रशाला इब्राहिमपूर : ८९.२८ टक्के,श्री महादेव विद्या मंदिर बोरगाव (दे) : ८९.२८ टक्के, विद्या विजय प्रशाला बोरगाव (दे) : ९१.६६ टक्के,श्री शंकरलिंग प्रशाला हत्तीकणबस : ८७.१७ टक्के, श्री मल्लिकार्जुन विद्यालय केगांव : ८०.८८ टक्के,श्री बसवेश्वर प्रशाला काझीकणबस : ९२.५९ टक्के, मलकप्पा पाटील प्रशाला कोर्सेगांव : ८७.५० टक्के,कोंडीबा इंगळे प्रशाला, कर्जाळ : ६८.९६ टक्के, जय हनुमान विद्यामंदिर शेगाव : ९४.४४ टक्के, इस्लाह ब्रिगेड अँग्लो उर्दू हायस्कूल करजगी : ६९.४४ टक्के, मातोश्री एल.एस.म्हेत्रे प्रशाला दुधनी : ८०.६४, श्री तारामता प्रशाला अक्कलकोट : ५६ टक्के,सांगवी प्रशाला सांगवी : ८८.२३ टक्के, के.बी. एन.माध्यमिक आश्रम शाळा नागनहळ्ळी : ७५.४३ टक्के,माध्यमिक आश्रम शाळा रुद्देवाडी : ७७.९० टक्के,माध्यमिक आश्रम शाळा हंजगी : ७८.१८ टक्के, श्री डुंगरनायक महाराज माध्यमिक आश्रम शाळा डिग्गेवाडी : ६१.३६ टक्के, शावरसिद्ध प्रशाला आळगे : ९४.८७ टक्के,श्री मलकारसिद्ध हायस्कूल हालचिंचोळी : ९६.७७ टक्के, शंभू महादेव विद्यामंदिर घोळसगांव मराठी : ७२.७२ टक्के, श्री विरभद्रेश्वर प्रशाला म्हैसलगी : ८३.८७ टक्के, मिरजगी प्रशाला मिरजगी : ७६.१९ टक्के, बणजगोळ प्रशाला बणजगोळ : ६९.२३ टक्के, रखमाबाई जिवबा काळे प्रशाला सातनदुधनी : ७८.१२ टक्के, मातोश्री
प्रशाला सदलापूर : ६९.५६ टक्के,शाहू -फुले- आंबेडकर विद्यालय काझीकणबस ६६.
६६ टक्के.

केवळ ११ शाळांचा निकाल १०० टक्के

शारदा माता इंग्लिश मीडियम स्कूल शिवपुरी,श्री स्वामी समर्थ प्रशाला अरळी ,विद्याभारती विद्यालय गुरुकुल संगोगी (ब),श्री मल्लिकार्जुन प्रशाला बोरेगाव, एस. एस. जे.शेळके कन्या प्रशाला नागणसुर,शंभू महादेव विद्यामंदिर घोळसगांव कन्नड ,जनाब सय्यद उर्दू हायस्कूल दुधनी, इंडियन मॉडेल स्कूल अक्कलकोट, शासकीय निवासी शाळा अक्कलकोट,केशव आबाजी इंग्लिश मीडियम स्कूल तडवळ, मातोश्री खेडगी प्रशालेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

गतवर्षीच्या तुलनेत १४ दिवस आधी निकाल

गेल्या वर्षी २७ मे रोजी निकाल लागला होता.यात अक्कलकोट तालुक्याचा निकाल ९६.४८ टक्के लागला होता.यामध्ये २०२३ च्या तुलनेत दीड टक्क्यांनी गुणवत्ता वाढली होती.यामध्ये गत वर्षी ३२ शाळांचा निकाल शंभर टक्के टक्के लागला होता.यावर्षी १० टक्के निकाल कमी लागला.तसेच केवळ ११ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आणि निकाल देखील चौदा दिवस आधी लागला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!