ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शुबमन गिल ठरला भारताचा पाचवा कसोटी युवा कर्णधार !

मुंबई : वृत्तसंस्था

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. इंग्लंडविरुद्धच्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयने १८ खेळाडूंची निवड केली आहे. रोहित शर्माने कसोटीला निरोप दिल्यानंतर, संघाची धुरा शुबमन गिलकडे सोपवण्यात आली आहे, तर ऋषभ पंतला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. यापूर्वी, जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर संघाचा उपकर्णधार होता.

इंग्लंड दौऱ्यासाठी शुबमन गिलला भारतीय कसोटी संघाचा कर्णधार बनवताच त्याच्या नावावर एक अनोखा पराक्रम नोंदवण्यात आला. गिल आता भारताच्या कसोटी इतिहासातील पाचवा सर्वात तरुण कर्णधार बनला आहे. गिलने २५ वर्षे २५८ दिवसांच्या वयात ही कामगिरी केली आहे. त्याच्या आधी या यादीत चार दिग्गज होते, ज्यात मन्सूर अली खान पतौडी, सचिन तेंडुलकर, कपिल देव, रवी शास्त्री यांची नावे होती.आता शुबमन गिल या यादीत पाचव्या क्रमांकावर आला आहे.

आयपीएल २०२५ मध्ये गुजरात टायटन्सचे नेतृत्व करताना त्याने दाखवलेल्या शहाणपणा आणि समजुतीने निवडकर्त्यांचा विश्वास जिंकला. आता इंग्लंडमधील कठीण आव्हानांवर भारतीय युवा कर्णधार कसा मात करतो हे पाहणे मनोरंजक असेल.

भारताचे सर्वात तरुण कसोटी कर्णधार :

  1. मन्सूर अली खान पतौडी – २१ वर्षे ७७ दिवस
  2. सचिन तेंडुलकर – २३ वर्षे, १६९ दिवस
  3. कपिल देव – २४ वर्षे, ४८ दिवस
  4. रवी शास्त्री – २५ वर्षे २२९ दिवस
  5. शुबमन गिल – २५ वर्षे २५८ दिवस
  6. इंग्लंड दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ :
  7. शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक, उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!