---Advertisement---

मंत्री शिरसाट यांच्या लेकावर गुन्हा दाखल करा ; अंजली दमानियांची मागणी !

By team
On: May 30, 2025 2:40 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

गेल्या चार ते पाच दिवसापासून राज्यातील महायुती सरकारमधील मंत्री संजय शिरसाट यांचे सुपुत्र सिद्धांत शिरसाट एका विवाहितेच्या कथित आरोपामुळे चर्चेत आल्यानंतर त्यांच्यावर आर्म्स ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. त्यांनी यासंबंधी सिद्धांत यांचा एक फोटो पोस्ट केला आहे त्यात सिद्धांत आपल्या डोक्याला पिस्तुल लावल्याच्या स्थितीत दिसून येत आहेत. सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका विवाहित महिलेने गंभीर आरोप केले होते. त्यात त्यांनी सिद्धांत यांच्यावर मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोप केला होता. विशेष म्हणजे त्यांच्या वकिलांनी त्या सिद्धांत यांची लग्नाची बायको असल्याचा दावा केला होता. यावेळी त्यांनी यासंबंधीची वाच्यता न करण्यासाठी त्यांनी आपल्या स्वतःच्या डोक्याला पिस्तुल लावल्याचेही स्पष्ट केले होते. अंजली दमानिया यांनी शुक्रवारी एका पोस्टद्वारे या प्रकरणी सिद्धांत शिरसाट यांच्यावर आर्म्स ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

काय आहे अंजली दमानिया यांच्या पोस्टमध्ये?

अंजली दमानिया यांनी एक फोटो पोस्ट केला आहे. त्यात मंत्री संजय शिरसाट यांचे सुपुत्र सिद्धांत शिरसाट हे आपल्या डोक्याला पिस्तुल लावल्याच्या स्थितीत दिसून येत आहेत. या फोटोवरून त्यांनी सिद्धांत यांच्यावर आर्म्स ॲक्ट अर्थात शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या फोटोमुळे छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे सिद्धांत यांच्यावर विवाहितेने गंभीर आरोप केल्यामुळे एकच खळबळ माजली होती. या प्रकरणी संजय शिरसाट व त्यांच्या कुटुंबीयांवर टीकेची झोड उठल्यानंतर विवाहितेने स्वतः समोर येत आपले आरोप मागे घेतले होते. हे आमचे घरगुती प्रकरण आहे. त्याचे कुणीही राजकारण करू नये. मी सिद्धांत शिरसाट यांच्यावर केलेले आरोप मागे घेते आणि या प्रकरणाला फुलस्टॉप देते. माझ्या खांद्यावर बंदुक ठेवून कुणीही राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये.

मी संजय शिरसाट यांचा सन्मान करते. त्यांनी मला कधीही त्रास दिला नाही. साधा फोनही केला नाही. माझ्यावर कोणताही दबाव नाही. मला हे प्रकरण संपवायचे आहे. यात गुंतून न पडता पुढे जायचे आहे. यापुढे माझ्या नावाने कुणी सोशल मीडिया किंवा इतर ठिकाणी राजकारण करण्याचा प्रयत्न केला तर मी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करेल, असे सदर विवाहिता म्हणाली होती.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!