---Advertisement---

एकाच दिवसात चांदी नव्या उच्चांकी भावावर !

By team
On: June 7, 2025 9:48 AM
Follow Us:
---Advertisement---

जळगाव : प्रतिनिधी

चांदीची भाववाढ सुरूच असून, शुक्रवारी (६ जून) एकाच दिवसात ४ हजार १०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदी एक लाख पाच हजार ८०० रुपये अशा नव्या उच्चांकी भावावर पोहोचली आहे. सोन्याच्या भावातही ३०० रुपयांची वाढ होऊन ते ९७ हजार ८०० रुपयांवर पोहोचले आहे.

गेल्या पाच दिवसांपासून सोने चांदीचे भाव दररोज वाढत आहेत. यात सोन्याच्या भावात फारशी वाढ झाली नाही. मात्र, चांदीच्या भावात गुरुवार, ५ जूनवगळता दररोज मोठी भाववाढ सुरू आहे. २ जून रोजी ५०० रुपयांची वाढ होऊन चांदी ९८ हजारांवर पोहोचली होती. ३ रोजी दोन हजार ५००, ४ रोजी एक हजार १०० रुपयांच्या वाढीसह चांदी एक लाख एक हजार ६०० रुपयांवर पोहोचली होती. ५ जून रोजी १०० रुपयांची वाढ झाली. चांदीचा भाव एक लाख एक हजार ७०० रुपये झाला आहे.

चांदीच्या भावाची गेल्या चार दिवसांची स्थिती पाहिली तर त्यात सात हजार ८०० रुपयांची वाढ झाली आहे. २ जून रोजी ९८ हजार रुपये असलेली चांदी दि. ६ रोजी एक लाख पाच हजार ८०० रुपये प्रतिकिलो झाली आहे.  ६ जून रोजी तर चांदीत थेट चार हजार १०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदी एक लाख पाच हजार ८००0 रुपये प्रतिकिलो अशा नव्या उच्चांकी भावावर पोहोचली. यापूर्वी २८ मार्च रोजी चांदी एक लाख दोन हजार अशा उच्चांकी भावावर पोहोचली होती.

त्यानंतर हा भाव कमी-कमी होत गेला. आता पुन्हा ३ जूनपासून चांदीचा भाव एक लाख पार गेला व सव्वा दोन महिन्यांनंतर ६ जून रोजी चांदीचा भाव एक लाख पाच हजार ८०० अशा नव्या उच्चांकी भावावर पोहोचला

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!