पुणे,दि.२६ : मराठा आरक्षणावरील तात्पुरती स्थगिती उठविण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात सदोष याचिका दाखल केली आहे. हे सरकार मराठा समाजातील तरुणांच्या आयुष्याशी खेळत आहे,असा स्पष्ट आरोप शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी केला आहे.
मराठा आरक्षणाबाबत पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेतते बोलत होते.मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी राज्य सरकारवर हा गंभीर आरोप केला आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती, सारथी संस्था, डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह निधी मंजूर केला खरा परंतु मराठा समाजातील तरुणांची संख्या पाहता या योजनांमधील निधी पुरेसा नाही, असेही ते म्हणाले. न्यायालयात दाखल केलेली याचिका सदोष असल्याचेही मेटे यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे.