ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी अभय खोबरे

सचिवपदी शिरीष पंडित तर खजिनदारपदी विठ्ठल तेली यांची निवड

अक्कलकोट ; तालुका प्रतिनिधी

येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे यांची अक्कलकोट लायन्स क्लबच्या लायनेस्टिक वर्ष २०२५-२६ च्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. सचिवपदी शिरीष पंडित तर खजिनदारपदी विठ्ठल तेली यांची बिनविरोध निवड झाली.

लायन्स क्लबच्या नव्या कार्यकारिणीची निवड सभा नुकतीच क्लबच्या सभागृहात उत्साहात पार पडली. मावळते अध्यक्ष शिवानंद नंदर्गी यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. यावेळी मावळते सचिव सुधीर माळशेट्टी आणि मावळते खजिनदार डॉ. सुनील बिराजदार यांचीही उपस्थिती होती. निवड प्रक्रिया एकमताने पार पडली.

या निवडीत पत्रकार चेतन जाधव यांची प्रथम उपाध्यक्ष, कल्याणी आळगी यांची द्वितीय उपाध्यक्ष तर राजू कारीमुंगी यांची तृतीय उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली.

कार्यक्रमास माजी प्रांतपाल राजशेखर कापसे, झोन चेअरमन मल्लिकार्जुन मसुती, लायन्स स्कूल कमिटीचे चेअरमन राजेंद्र हत्ते, व्हाईस चेअरमन सुभाष गडसिंग, शाळेचे सचिव शिवशंकर खुबा, ज्येष्ठ लायन प्रभाकर मजगे, शिवपुत्र हळगोदे, मल्लिनाथ साखरे, डॉ. प्रदीप घिवारे, बाबासाहेब निंबाळकर, चंद्रकांत वेदपाठक, शदीद वळसंगकर, गौरीशंकर चनशेट्टी, संतोष जिरोळे, महेश हिंडोळे, महिबुब सलगरकर, सिद्धया मठ, राजू हिप्परगी, सुभाष खमितकर, कमल अल्लोळी, अभिनंदन गांधी, मंदार महाराज पुजारी आदी मान्यवर उपस्थित होते.

निवडीनंतर मनोगत व्यक्त करताना नूतन अध्यक्ष खोबरे म्हणाले,या वर्षात लायन्स क्लबतर्फे विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून लोकसेवेचे व्रत जपले जाईल.त्यांच्या या संकल्पास उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात पाठिंबा दर्शविला. या निवडीनंतर अक्कलकोट लायन्स क्लबच्या सामाजिक कार्याला नवे बळ मिळणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!