ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोन्याच्या भावात मोठी वाढ ; चांदी 1,137 रुपयांनी वाढली

नवी दिल्ली । भारतीय बाजारात सोन्याच्या भावात आज मोठी वाढ झाली आहे. तर चांदीमध्ये देखील मोठ्या प्रमाणत वाढ झाली आहे. सोन सध्या प्रति 10 ग्रॅम 50 हजार रुपयांच्या खाली आहे. 11 जानेवारी 2021 रोजी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 389 रुपयांची वाढ झाली. त्याचबरोबर चांदीची किंमत आज 1,137 रुपयांनी वाढली. गेल्या व्यापार सत्रात दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 48,477 रुपयांवर बंद झाले. त्याचबरोबर चांदीचा दर प्रति किलो, 63,589. रुपये होता. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत आज वाढ झाली आहे, तर चांदीची किंमत कायम आहे.

सोन्याचे नवीन दर

सोमवारी दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याच्या भावात प्रति 10 ग्रॅम 389 रुपयांची वाढ झाली. राजधानी दिल्लीमध्ये 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याची नवीन किंमत आता प्रति 10 ग्रॅम 48,866 रुपयांवर गेली आहे. ट्रेडिंग सेशनच्या आधी सोन्याच्या दर प्रति 10 ग्रॅम 48,477 रुपयांवर बंद झाले होते. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत आज प्रति औंस 1,853 डॉलर झाली.

चांदीचे नवीन दर

सोमवारी चांदीमध्येही वाढ नोंदली गेली. आज दिल्ली सराफा बाजारात चांदीच्या किंमतीत 1,137 रुपये प्रतिकिलो वाढ झाली आहे. आता त्याची किंमत प्रति किलो 64,726 रुपयांवर पोहोचली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीची किंमत प्रति औंस 25.14 डॉलरवर बंद झाली. काल आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) चांदीचा भाव तसाच राहिला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!