---Advertisement---

श्रावणात फुलांना वाढलेली मागणी, पण पावसामुळे दरवाढ; झेंडू, शेवंती, निशिगंध महागले

By team
On: July 30, 2025 10:29 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर पूजा, हार तयार करणे तसेच मंदिरांची सजावट यासाठी फुलांची मागणी लक्षणीयरीत्या वाढली आहे. मात्र, राज्यात सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे फुलांचे उत्पादन व प्रत यावर परिणाम झाला आहे. परिणामी, बाजारात ओल्या व खराब फुलांची आवक वाढली असून चांगल्या प्रतीच्या फुलांची कमतरता जाणवू लागली आहे.

या परिस्थितीचा थेट परिणाम फुलांच्या दरांवर झाला आहे. मागील दोन दिवसांच्या तुलनेत झेंडू व शेवंती फुलांच्या दरात २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली असून, निशिगंध फुलांचे दर तर ३० टक्क्यांहून अधिकने वाढले आहेत.

फुलांचे व्यापारी व विक्रेते सांगतात की, ग्राहकांकडून चांगल्या प्रतीच्या फुलांना विशेष मागणी आहे, परंतु अशा फुलांची आवक कमी असल्याने त्यांचे दर चढे आहेत.

अनेक शेतकऱ्यांनी विक्रीसाठी पाठवलेल्या फुलांमध्ये भिजलेल्या मालाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे चांगले फूल मिळवणे अवघड बनले आहे. तथापि, श्रावण महिना सुरू असल्याने पूजेसाठी व धार्मिक कार्यासाठी फुलांची मागणी पुढील काही दिवस कायम राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

फुलांची आवक ज्या भागांमधून होते:

  • झेंडू – अकोला, बुलढाणा, वाशीम, सोलापूर, सातारा

  • निशिगंध – पातूर, बारामती, मुंबई

  • शेवंती – अकोट, नगर, सातारा, भुसावळ

व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, पावसाचे प्रमाण कमी झाले आणि बाजारात फुलांची नियमित आवक सुरू झाली तर दरात स्थिरता येऊ शकते. सध्या मात्र ग्राहकांना अधिक दर मोजूनच फुले खरेदी करावी लागत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!