---Advertisement---

यंदा अकरा दिवसांच्या गणेशोत्सवाची धूम ; पूजेसाठी सर्वोत्तम मुहूर्त

By team
On: August 27, 2025 9:03 AM
Follow Us:
---Advertisement---

 मुंबई : वृत्तसंस्था

आज सर्वत्र बाप्पांच्या आगमनाचा जल्लोष होत आहे. बुधवारी ब्राह्ममुहूर्तापासून म्हणजे पहाटे ४:५० ते दुपारी १:५३ पर्यंत गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करावी. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना मध्यान्हानंतर देखील करता येऊ शकते.

विशेष म्हणजे यंदाचा गणेशोत्सव हा दहा नव्हे, तर अकरा दिवसांचा असणार आहे, अशी माहिती दाते पंचागकर्ते मोहन दाते यांनी दिली. ज्या गणेशाचे आवाहन आपण सुमुहूर्तमस्तु म्हणजे तू स्वतःच एक सुमूहुर्त आहेस, असे म्हणून करतो, त्याच्या पूजनासाठी विशिष्ट नक्षत्र, योग, विष्टि करण, तसेच राहूकाल, शिवालिखित आदी कोणतीही कोष्टके पाहण्याची आवश्यकता नाही. प्रात:कालापासून मध्यान्हापर्यंत कोणत्याही वेळी स्थापना आणि पूजा करता येते, असे दाते यांनी नमूद केले.

श्रीगणेश चतुर्थीच्या आधी एक दिवस किंवा त्याच दिवशी सकाळी मूर्ती आणावयास पाहिजे, असे नाही. तर दुकानातून गणपतीची मूर्ती ८ ते १० दिवस आधीसुद्धा आणून घरामध्ये ठेवता येते. घरातील गणेशमूर्ती जास्तीत जास्त एक वीतभर उंचीची आणि आसनस्थ असावी, असेही दाते यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!