---Advertisement---

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलांची आमदारकी रद्द करा; समस्त ब्राह्मण समाज समन्वय समितीची मागणी

On: January 16, 2021 4:29 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर (प्रतिनिधी) : बाबर हा मुस्लिम  नसून गोडसे, गाडगीळ, दाते यांचे वंशज होते असा जावईशोध भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लावला आहे. सिंधुदुर्ग येथील एका कार्यक्रमात बोलताना  त्यांनी हे अजब विधान केले होते. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या या विधानामुळे त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा समस्त ब्राह्मण समन्वय समितीचे समन्वयक प्रा. काकासाहेब कुलकर्णी यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदनही संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

पुढे बोलताना कुलकर्णी म्हणाले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी आमदारकिची शपथ घेत असताना संविधानाची शपथ घेतली होती मात्र त्यांच्या या वक्तव्याने धार्मिक तेढ निर्माण होऊन त्यांनी घेतलेल्या शपथेचा भंग झाला आहे. त्यामुळे त्यांची आमदारकी तातडीने रद्द करावी असेही कुलकर्णी यांनी आपल्या पत्रकात म्हंटले आहे.

यावेळी ब्रम्हगर्जना प्रतिष्ठानचे अध्यक्ष  विक्रम डोनसळे, ब्राह्मण महासंघाचे उमेश काशीकर, ब्राह्मण महासंघाचे विनायक फलटणकर, निलेश देशपांडे, युवक जिल्हाअध्यक्ष अभिजीत कुलकर्णी, पद्मजा टोळे, यदुनाथ देशपांडे, सुबोध देशपांडे, राधिका कुलकर्णी, सौ. सुनीता देशपांडे, सौ. गौरी आमडेकर आदी समाजबांधव उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!