---Advertisement---

एपस्टीन फाईल्समधून मोठा स्फोट; डोनाल्ड यांच्यावर बलात्काराचा आरोप !

By team
On: December 24, 2025 12:17 PM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली वृत्तसंस्था : अमेरिकेतील कुख्यात जेफ्री एपस्टीन प्रकरणाशी संबंधित फाईल्समधून एक धक्कादायक आरोप समोर आला असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने (DOJ) मंगळवारी रात्री या प्रकरणाशी संबंधित सुमारे ३० हजार पानांचे दस्तावेज जाहीर केले असून त्यामध्ये ट्रम्प आणि एपस्टीन यांच्यातील जुने संबंध, खासगी विमान प्रवास, छायाचित्रे आणि विविध ई-मेल्सचा समावेश आहे.

या ‘एपस्टीन फाईल्स’मध्ये यापूर्वी माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, पॉपस्टार मायकल जॅक्सन यांच्यासह अनेक प्रभावशाली व्यक्तींची नावे आणि छायाचित्रे समोर आली होती. मात्र आता थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर करण्यात आलेल्या बलात्काराच्या आरोपामुळे अमेरिकन राजकारणात आणि समाजात मोठी खळबळ उडाली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधी सार्वजनिकरित्या एपस्टीनसोबत आपले संबंध तुटल्याचे सांगितले होते. तसेच आपण कधीही एपस्टीनसोबत खासगी विमानाने प्रवास केला नसल्याचा दावा केला होता. मात्र नव्याने समोर आलेल्या फ्लाईट लॉग्स आणि ई-मेल्सनुसार १९९३ ते १९९६ या काळात ट्रम्प यांनी एपस्टीनसोबत सुमारे आठ वेळा खासगी प्रवास केल्याचा उल्लेख आहे. या प्रवासांमध्ये ट्रम्प यांची तत्कालीन पत्नी मार्ला मॅपल्स आणि त्यांची मुलेही सोबत असल्याचे दस्तावेजांत नमूद आहे. तथापि, या फाईल्समध्ये ट्रम्प यांनी थेट कोणता गुन्हा केल्याचा ठोस उल्लेख असल्याचे स्पष्ट करण्यात आलेले नाही.

या फाईल्सनुसार काही विमान प्रवासात एपस्टीनचा सहकारी गिस्लेन मॅक्सवेलही उपस्थित होता. मॅक्सवेलला अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण आणि सेक्स ट्रॅफिकिंगप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. एका १९९३ मधील प्रवासात एपस्टीन, ट्रम्प आणि एका २० वर्षीय तरुणीचा उल्लेख असून, तिची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे. या आणि इतर महिलांचा सेक्स ट्रॅफिकिंगशी संबंध असल्याचा दावा दस्तावेजांत आढळतो.

सर्वात गंभीर बाब म्हणजे, एफबीआयच्या नोंदींच्या आधारे तयार करण्यात आलेल्या ऑक्टोबर २०२० मधील एका फाईलमध्ये एका महिलेने डोनाल्ड ट्रम्प आणि जेफ्री एपस्टीन यांनी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप केल्याचा उल्लेख आहे. या प्रकरणात एका लिमोझीन चालकाच्या साक्षीचाही संदर्भ देण्यात आला असून, १९९५ मध्ये त्याने एका फोन संभाषणात ट्रम्प यांनी एका मुलीसोबत केलेल्या वर्तनाचा उल्लेख केल्याचा दावा केला आहे. मात्र संबंधित पीडितेची नंतर गोळी झाडून हत्या झाल्याची माहितीही फाईल्समध्ये नमूद आहे.

एफबीआयने या आरोपांबाबत तपास अद्याप सुरू असल्याचे सांगत कोणताही सविस्तर खुलासा करण्यास नकार दिला आहे. तरीही, एपस्टीन फाईल्समधील या ताज्या खुलास्यांमुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी वाढल्याचे स्पष्ट दिसत असून, येत्या काळात या प्रकरणाचे राजकीय आणि कायदेशीर पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!