---Advertisement---

शरद पवार गटाला धक्का; बडा नेता भाजपात दाखल

By team
On: December 30, 2025 6:51 PM
Follow Us:
---Advertisement---

धुळे वृत्तसंस्था : महानगरपालिका निवडणुकीच्या ऐन धामधुमीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा हादरा बसला आहे. धुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले यांनी पक्षाला रामराम ठोकत थेट भाजपात प्रवेश केला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीच हा राजकीय भूकंप घडल्याने धुळे शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रणजित भोसले यांनी आपल्या पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला. विशेष म्हणजे, त्यांच्या पत्नी उज्ज्वला भोसले या धुळे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 मधून भाजपच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. पत्नीच्या प्रचाराला बळ देण्यासाठी आणि राजकीय समीकरणे आपल्या बाजूने वळवण्यासाठी रणजित भोसले यांनी हा निर्णायक पाऊल उचलल्याची चर्चा आहे.

शेवटच्या क्षणी झालेल्या या पक्षांतरामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला मोठा धक्का बसला असून, पक्षाची धुळे शहरातील संघटनात्मक ताकद कमकुवत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे भाजपसाठी हा प्रवेश मोठे यश मानले जात असून, रणजित भोसले आता पत्नी उज्ज्वला भोसले यांच्या विजयासाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार असल्याचे सांगितले जात आहे.

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घडामोडीमुळे धुळ्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून, पुढील काही दिवसांत आणखी पक्षबदल होतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!