---Advertisement---

नीट परीक्षेत सोलापूरच्या डाॅ. चव्हाण दाम्पत्याचे यश

By team
On: February 2, 2026 2:20 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

नीट (सुपर स्पेशालिटी) परीक्षेत सोलापूरच्या डॉ. दिग्विजय-क्रांती चव्हाण या दाम्पत्याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. डॉ. क्रांती यांनी देशात तिसरा तर त्यांचे पती डॉ. दिग्विजय विद्यानंद चव्हाण यांनी देशात ५२ वा क्रमांक मिळवला आहे. पती-पत्नीने नीट परीक्षेत मिळवलेल्या या यशाचे एकमेव उदाहरण आहे.

मूळचे सोलापूरचे असलेले डॉ. दिग्विजय चव्हाण यांचे वडील व ३२ वर्षांपासून भूलतज्ज्ञ म्हणून सेवा देणारे डॉ. विद्यानंद मनोहर चव्हाण हे अश्विनी हॉस्पिटलमध्ये सल्लागार समिती सदस्य म्हणून कार्यरत आहेत. अक्कलकोटचे माजी आमदार कै. बी. टी. माने यांचा डाॅ. दिग्विजय हा पणतू आहे.
डॉ. क्रांती चव्हाण या मूळच्या आंबेजोगाई (जि. बीड) येथील असून, मे २०२५ मध्ये त्यांचा विवाह डॉ. दिग्विजय चव्हाण यांच्याशी झाला. दोघेही एम. डी. (मेडिसिन) उत्तीर्ण असून, पुढे हृदयरोगतज्ज्ञ होण्याचे त्यांचे स्वप्न आहे.

डॉ. दिग्विजय चव्हाण यांचे प्राथमिक शिक्षण सेंट जोसेफ या शाळेत, तर बारावीपर्यंतचे शिक्षण संगमेश्वर महाविद्यालयात झाले आहे. मुंबई येथील सेठ जी. एस. मेडिकल कॉलेज (केईएम) येथून एमबीबीएस पदवी पूर्ण केली असून, लोकमान्य टिळक रुग्णालय, सायन येथून एमडी (मेडिसिन) पदवी संपादन केली आहे. डॉ. क्रांती यांनी मुंबई येथील तोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज (नायर) येथून एमबीबीएस पदवी घेतली असून, लोकमान्य टिळक रुग्णालय, सायन येथून एम. डी. (मेडिसिन) पदवी पूर्ण केली आहे. वैद्यकीय शिक्षणासोबतच कलाक्षेत्रातही त्यांनी ठसा उमटवला असून, ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेत त्यांनी वारकऱ्यांची भूमिका साकारली आहे. याशिवाय अनेक नाटकांत त्यांनी काम केल्याची माहिती डॉ. विद्यानंद चव्हाण यांनी दिली.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!