---Advertisement---

वाढदिवसाचा उत्सव दुःखात बदलला; पिलीवजवळ दुचाकी अपघातात दोन मित्र ठार, दोन गंभीर जखमी !

By team
On: February 28, 2026 5:42 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : वृत्तसंस्था 

जिल्ह्यातील पिलीवजवळ गुरुवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास घडलेल्या भीषण दुचाकी अपघातात स्वप्निल सुळे (वय १८, रा.सुळेवाडी, ता.माळशिरस) आणि राजवर्धन बापू शिरतोडे (वय १८, रा.खडकी, ता.माण) यांचा मृत्यू झाला. अपघातात स्वप्निलचे दोन मित्र, साईराज सुळे आणि गणेश माने (तिघेही रा.सुळेवाडी, वय १८) गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिसांच्या माहितीप्रमाणे, स्वप्निल सुळे हा वाढदिवस साजरा करण्यासाठी मित्रांना घेऊन मोटारसायकलवर (एमएच ४५ एजी ६७९०) पिलीवजवळ कपडे आणण्यासाठी जात होता. पिलीवजवळील बागवान टेकाजवळ चारचाकी वाहन ओव्हरटेक करत असताना खडकीकडून आलेल्या राजवर्धन शिरतोडे यांच्या दुचाकीशी जोरदार धडक झाली. धडक इतकी भयंकर होती की स्वप्निल व राजवर्धन यांचा जागीच मृत्यू झाला, तर मित्रांची गंभीर जखमी झाली.

अपघात झालेल्या ठिकाणी सातारा-सोलापूर महामार्गावर मोठा उतार असून वाहन नियंत्रीत करणे कठीण आहे. स्थानिकांनी मागील अपघातानंतरही गतीरोधक बसवण्याची मागणी केली होती, मात्र अद्याप उपाययोजना झाली नाहीत. स्वप्निल, साईराज आणि गणेश हे तिघे मित्र म्हसवड येथे १२ वी मध्ये शिकत होते. अपघाताच्या दिवशी ते वाढदिवस साजरा करण्यासाठी निघाले होते, पण काळाने त्यांच्या परिवारावर आणि मित्रपरिवारावर वेदनादायक वेळ घातला. स्वप्निल सुळे यास अकलूज येथील आश्विनी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना रात्री १.३० वाजता मृत्यू झाला. जखमी मित्रांवर सध्या उपचार सुरु आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!