---Advertisement---

एक तारखेपासून जलतरण तलाव खुले, चित्रपटगृहेही पूर्ण क्षमतेने

On: January 28, 2021 11:12 AM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रसार सुरु झाल्यानंतर देशात लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. त्यानंतर हळूहळू अनलॉक अंतर्गत अनेक गोष्टी सुरु करण्याची परवानगी देण्यात आली. आता गृह मंत्रालयाकडून नवीन दिशानिर्देश जाहीर करण्यात आले आहेत. यात जलतरण तलाव आता सर्वांसाठी खुले करणे आणि चित्रपटगृह पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

आतापर्यंत जलतरण तलाव फक्त खेळाडूंसाठी आणि चित्रपटगृह ५०% प्रेक्षक संख्येसह सुरू करण्यास परवानगी होती. अनलॉकचे नवीन दिशानिर्देश १ ते २८ फेब्रुवारी या काळासाठी लागू असतील. जलतरण तलावाबाबत क्रीडा मंत्रालय, चित्रपटगृहांबाबत माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या वतीने एसआेपी दिली जाईल. तसेच आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी नागरी उड्डयन मंत्रालय, गृह मंत्रालयासोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अनलॉक दिशानिर्देशानुसार, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नियम व मानक संचालन प्रक्रिया लागू करणे सर्व राज्यांना गरजेचे आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!