---Advertisement---

पत्रकार परिषदेत आक्षेपार्ह वक्तव्य; वसंत मोरे यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा !

By team
On: March 6, 2026 2:30 PM
Follow Us:
---Advertisement---

पुणे : वृत्तसंस्था

शिवसेना ठाकरे गटाचे नेते व पुण्यातील माजी नगरसेवक वसंत मोरे यांच्या विरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण पत्रकार परिषदेत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे उभे राहिले आहे.

72 वर्षीय विश्वनाथ रुकारां लहाडे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला. लहाडे यांच्या तक्रारीनुसार, मोरे यांनी 25 फेब्रुवारी रोजी पुणे महापालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत आपल्याबद्दल अपमानास्पद विधान केले.

फिर्यादी लहाडे यांनी नमूद केले की, मोरे यांनी “लहाडे इतका दारू पिला होता की त्याला बोलताही येत नव्हते. ओढ्यात उतरून गटारे साफ करत आहे” असे वक्तव्य केले. या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यातून त्यांची सामाजिक प्रतिष्ठा धोक्यात आली आणि कुटुंबावर मानसिक ताण निर्माण झाला आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणातील सर्व घटकांचा तपशीलवार अभ्यास करत पुढील कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे.

या घटनेनंतर पुण्यातील राजकीय व सामाजिक वर्तुळात चर्चा रंगली असून, पत्रकार परिषदेत झालेल्या वक्तव्याचा सामाजिक आणि राजकीय परिणाम काय होईल याकडे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!