---Advertisement---

गॅस तुटवड्याविरोधात काँग्रेसचे अनोखे आंदोलन; सोलापुरात एलपीजी सिलिंडरची ‘अंत्ययात्रा’ !

By team
On: March 11, 2026 5:20 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : वृत्तसंस्था 

देशभरात निर्माण झालेल्या एलपीजी गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात काँग्रेस पक्षाने केंद्र सरकारविरोधात अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडले. गॅस सिलिंडरच्या वाढत्या दरांसह तुटवड्याचा निषेध नोंदवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी एलपीजी सिलिंडरची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढत जोरदार घोषणाबाजी केली.

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे देशातील गॅस पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे सांगितले जात असताना सामान्य नागरिकांना त्याचा मोठा फटका बसत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला. गॅस सिलिंडरचा तुटवडा आणि दरवाढ यामुळे सर्वसामान्यांच्या घरगुती अर्थकारणावर गंभीर परिणाम होत असल्याचेही आंदोलनकर्त्यांनी म्हटले.

या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात काँग्रेसच्या वतीने आंदोलन आयोजित करण्यात आले होते. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका करत घोषणाबाजी केली. तसेच केंद्रातील नरेंद्र मोदी  सरकारच्या परराष्ट्र धोरणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.

आंदोलनादरम्यान काही कार्यकर्त्यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा उल्लेख करत केंद्र सरकारवर टीका केली. तसेच देशाच्या माजी पंतप्रधान इंद्रिया गांधी यांच्या धोरणांचा दाखला देत त्यांच्याकडून काहीतरी शिकण्याची गरज असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. या आंदोलनाचा भाग म्हणून एलपीजी गॅस सिलिंडरला तिरडीवर ठेवून प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. या माध्यमातून गॅस तुटवडा आणि वाढत्या दरांविरोधात तीव्र निषेध नोंदवण्यात आला. केंद्र सरकारने देशातील गॅस तुटवड्याच्या प्रश्नावर तातडीने उपाययोजना कराव्यात आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी केली. या आंदोलनामुळे सोलापूर शहरात काही काळ राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!