मेष – आज जुन्या नात्यांमधील गोडवा वाढेल. एखाद्या जुन्या मित्राची भेट झाल्याने मन प्रसन्न होईल. घरात पाहुण्यांचे आगमन होण्याची शक्यता आहे. मुलांच्या भविष्याबाबत थोडी चिंता वाटू शकते, त्यामुळे त्यांना योग्य मार्गदर्शन करा. जुनी इच्छा पूर्ण होण्याचे संकेत आहेत.
वृषभ – आज आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. बदलत्या वातावरणामुळे थकवा किंवा अशक्तपणा जाणवू शकतो. व्यवसायातील दीर्घकालीन योजना भविष्यात फायदेशीर ठरतील. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांनी मेहनत सुरू ठेवावी. प्रवासाचे नियोजन करताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या.
मिथुन – आज मालमत्ता आणि गुंतवणुकीशी संबंधित निर्णय घेताना सावध राहा. नवीन प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार पुढे येऊ शकतो. मात्र कोणताही मोठा आर्थिक निर्णय घाईने घेऊ नका. अहंकार टाळा आणि इतरांच्या यशातून प्रेरणा घ्या. जवळच्या व्यक्तीच्या आरोग्याची चिंता सतावू शकते.
कर्क – आज नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. वैवाहिक जीवनात आनंद आणि गोडवा राहील. अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. कोणाच्या सांगण्यावरून वादात पडू नका. प्रेमसंबंधात दिखावा करण्यापेक्षा प्रामाणिकपणाला महत्त्व द्या.
सिंह – आज जवळच्या मित्र किंवा नातेवाईकाची भेट होण्याची शक्यता आहे. गुंतवणूक आणि बचत योजनांकडे तुमचा कल वाढेल. योग्य नियोजन करून आर्थिक निर्णय घेतल्यास फायदा होऊ शकतो. मित्रांसोबत आनंदात वेळ घालवण्याची संधी मिळेल.
कन्या – आज मुलांकडून एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. व्यवसायात प्रगतीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल राहण्याची शक्यता आहे. व्यावसायिक कामानिमित्त धावपळ वाढू शकते. महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर द्या.
तूळ – आज आळस झटकून कामाला लागण्याची गरज आहे. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आरोग्यामुळे चिंता वाढू शकते. नवीन लोकांशी ओळखी होतील. कायदेशीर प्रकरणांमध्ये विशेष काळजी घ्या. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सर्व बाजू तपासून पाहा.
वृश्चिक – आज कुटुंबीयांसोबत आनंदाचे क्षण घालवता येतील. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. अनोळखी व्यक्तींवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. गुंतवणूक करण्यापूर्वी संभाव्य जोखमींचा विचार करा.
धनु – आजचा दिवस कुटुंबासोबत आनंदात घालवण्याची संधी मिळेल. तुमच्या चांगल्या स्वभावाचे आणि वागण्याचे लोक कौतुक करतील. कामाच्या ठिकाणी निष्काळजीपणा टाळा. वाहन चालवताना काळजी घ्या. शक्य असल्यास लांबचा प्रवास पुढे ढकला.
मकर – आज आर्थिक परिस्थिती मजबूत होण्याचे संकेत आहेत. घर किंवा मालमत्ता खरेदीच्या नियोजनाला गती मिळू शकते. मुलांना दिलेले वचन पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. घरात पाहुण्यांच्या आगमनामुळे आनंदाचे वातावरण राहील. मात्र वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवा.
कुंभ – आज नवीन कल्पनांमुळे जुन्या समस्यांवर तोडगा निघू शकतो. जुन्या ओळखीचा भविष्यात फायदा होण्याची शक्यता आहे. विवाह किंवा शुभकार्याशी संबंधित चर्चा पुढे सरकू शकते. कामाच्या ठिकाणी योग्य नियोजन केल्यास चांगले परिणाम मिळतील.
मीन – आज भावंडांसोबत काही मतभेद होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे काम पूर्ण करण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. मुलांच्या वागण्यामुळे थोडी चिंता वाटू शकते. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. कुटुंबातील सदस्यांशी संवाद ठेवा.










