सिडनी: सोशल मिडीयाचा वापर अधिक वाढल्याने माध्यमांनाही प्रसारासाठी सोशल मिडीयाचा आधार घ्यावा लागतो. फेसबुक सारखे माध्यम यासाठी प्रभावी आहे. दरम्यान ऑस्ट्रेलिया सरकारने नवीन मीडिया लॉअंतर्गत सोशल मीडिया कंपन्यांना ऑस्ट्रेलियातील स्थानिक न्यूज दाखवण्यासाठी पैसे द्यावे लागणार आहे. सोशल मीडिया कंपन्यांसाठी अशाप्रकारचा कायदा आणणारा ऑस्ट्रेलिया जगातील पहिलाच देश ठरला आहे. नवीन कायद्यानुसार, फेसबुक आणि गुगलसारख्या कंपन्यांना ऑस्ट्रेलियातील बातम्या दाखवण्यासाठी स्थानिक माध्यम कंपन्यांना पैसे द्यावे लागणार आहेत. गेले काही दिवस ऑस्ट्रेलिया सरकार आणि फेसबुकमध्ये या नवीन कायद्यावरुन तणाव निर्माण झाला होता. ऑस्ट्रेलिया सरकारच्या धोरणाला फेसबुक आणि गुगलनेही आक्षेप घेतला होता. या कायद्याला फेसबुक आणि गुगलनेही कडाडून विरोध केला होता, अखेरच्या क्षणी ऑस्ट्रेलियाच्या सरकारने या कायद्यात काही बदल करुन सोशल मीडिया कंपन्यांना थोडी सूट दिली, त्यानंतर सोशल मीडिया कंपन्यांनी पैसे देण्याची तयारी दर्शवली.
नवीन कायद्यामुळे फेसबुक आणि गुगलला लोकल कंटेंटच्या डील्समध्ये कोट्यवधी रुपये गुंतवणूक कऱण्याची संधी मिळेल. गुगल आणि फेसबुकलाही आता ऑस्ट्रेलियात स्थानिक न्यूज कंटेंटसाठी पैसे द्यावे लागणार आहे.