---Advertisement---

बाबरी मशीद पाडण्याची घटना पूर्वनियोजित नव्हती, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण खुलासा

Follow Us:
---Advertisement---

 

दिल्ली,दि.३० : 1992 साली बाबरी मशीद पाडल्याच्या घटनेचा निकाल अखेर बुधवारी जाहीर झाला. या प्रकरणामध्ये 32 आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. बाबरी मशीद पाडल्याबद्दल भाजप, आरएसएस आणि विश्व हिंदू परिषद तसेच कारसेवक यांच्यावर खटले दाखल झालेले होते.या प्रकरणाचा निकाल आज लागला. न्यायाधीश एस. के. यादव यांच्या न्यायालयात 32 आरोपींपैकी 26 आरोपी हे न्यायालयात उपस्थित होते. अनुपस्थित आरोपींना
व्हीसीद्वारे उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. यात भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी, उमा भारती, मुरलीमनोहर जोशी यांच्यासह सहा जण हे गैरहजर होते. हा निकाल दोन हजार पानांचा असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणांमध्ये एकूण 49 जण होते. त्यापैकी 17 जणांचा यापूर्वी मृत्यू झाला आहे. निर्दोष करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, सुधीर कक्कर, मुरलीमनोहर जोशी, सतीश प्रधान, रामचंद्र खत्री, संतोष दुबे, ओमप्रकाश पांडे, कल्याण सिंह, उमा भारती, रामविलास वेदांती, विनय कटियार, प्रकाश शरण, गांधी यादव, जय भानसिंग,लल्‍लू सिंह, कमलेश त्रिपाठी,ब्रूजभूषण सिंह, रामजी गुप्ता, महंत नृत्य गोपाल दास, साक्षी महाराज, विनय कुमार राय, नवीन भाई शुक्ला, धर्मदास, जय भगवान गोयल, साध्वी ऋतुंबरा, पवन पांडे, विजयबहादुर सिंह, धरमसिंग गुजर यांचा समावेश आहे. बाबरी मशीन प्रकरण हे पूर्वनियोजित नव्हते, असा महत्वपूर्ण खुलासा लखनऊ न्यायालयाने या प्रकरणामध्ये केला आहे. या प्रकरणात प्रबळ साक्षीदार नव्हते, असे देखील न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे 32 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. ही घटना अचानक घडलेली आहे, असे देखील न्यायालयाने या निकालात म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!