---Advertisement---

…..अखेर आमदार सुभाष देशमुख यांनी फेटा बांधून घेतला ! आमदार सचिन कल्ल्याणशेट्टी यांच्या बाबतीतला ‘पण’ अखेर पूर्ण

Follow Us:
---Advertisement---

मारुती बावडे

अक्कलकोट, दि.२७ : प्रत्येकाला इच्छा, आकांक्षा आणि ध्येय असते परंतु हे स्वतःपुरते ठीक आहे आपण आमदार व्हावे,मंत्री व्हावे पण आपला एक सहकारी माणूस आमदार व्हावा, यासाठी फेटा बांधून न घेणारा नेता काही औरच असेल ना.होय ही घटना आहे अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर गावच्याबाबतीत.

आमदार सुभाष देशमुख आणि सध्याचे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे संबंध हे खूप जुने आहेत परंतु जोपर्यंत सचिन कल्याणशेट्टी हे तालुक्याचे आमदार होत नाहीत. तोपर्यंत आपण फेटा बांधून घेणार नाही,असा पण त्यांनी काही वर्षांपूर्वी केला होता.ते नेहमी कार्यकर्त्यांच्या गराड्यात बोलून दाखवत असतं.अखेर तो ‘पण’
काल हन्नूर गावच्या सरपंच निवडीदरम्यान पूर्णत्वास गेला.स्वर्गीय पंचप्पा कल्याणशेट्टी आणि आमदार सुभाष देशमुख यांचेही संबंध खूप जवळचे होते.परंतु सचिन कल्याणशेट्टी हे आमदार व्हावेत यासाठी आमदार देशमुख यांनी केलेले प्रयत्न हे देखील फार महत्त्वाचे आहेत.

यासाठी त्यांच्या मनाचा मोठेपणा देखील आहे.या अगोदरच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आमदार देशमुख हे सचिन कल्याणशेट्टी आमदार झाल्यानंतर आपण फेटा बांधून घेऊ,असे अभिवचन ग्रामस्थांना दिले होते.ते पूर्ण करण्यासाठी खास हन्नूर येथे सरपंच निवडीदिवशी आले होते. त्यावेळी त्यांनी हन्नूर गाव आदर्श करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. विकासासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी हे तर तुमच्या सोबत आहेतच पण मी देखील आपल्या गावात सोबत आहे,असे अभिवचन आमदार देशमुख यांनी यावेळी ग्रामस्थांना दिले. मात्र आमदार देशमुख यांच्या या फेटा बांधून घेण्याच्या ‘पणा’ची मात्र ग्रामस्थांमध्ये जोरदार चर्चा होती.यामुळे आमदार सुभाष देशमुख आणि कल्याणशेट्टी परिवार यांचे असलेले जवळचे संबंध हे अधोरेखित झाले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!