---Advertisement---

मोठी बातमीः सुशांत सिंह राजपुत ड्रग्ज प्रकरणात आज होणार आरोपपत्र दाखल

On: March 5, 2021 11:53 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबईः बॉलिवूड अभिनेते सुशांत सिंह राजपुत आत्महत्याप्रकरण देशभरात गाजले. सुशांत सिंहची हत्या करण्यात आली असेही आरोप झाले. मात्र तपासातून सुशांतसिंह राजपुतने आत्महत्या केल्याचे उघड झाले होते. सुशांत सिंह राजपुत आत्महत्या प्रकरणाचा संबंध ड्रग्ज कनेक्शनशी जोडले गेले. त्यात अनेक दिग्गज बॉलिवूड अभिनेते, अभिनेत्रींचे नाव जोडले गेले. दरम्यान आज शुक्रवारी सुशांत सिंह ड्रग्ज प्रकरणात एनसीबी न्यायालयासमोर 30 हजार पानांचे आरोपपत्र दाखल करणार आहे. एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे स्वतः आरोपपत्र सादर करणार आहेत.

सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचं नाव या प्रकरणात समोर आलं होतं. रियाला अटक करण्यात आलं होतं. तसंच एक महिना ती तुरूंगातही होती. रियाचं नावही आरोपपत्रात असून, 30 हजार पानांच्या या आरोपपत्रांमध्ये रियाच्या भावासह 33 जणांची नावं असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना एनसीबी काही ड्रग्ज पेडलर्स आणि इतरांनाही अटक केली होती. त्यांचीही नावं यात आहेत.

14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह संशयास्पद आढळून आला होता. मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या घरात त्याने आत्महत्या केल्याचं पोलिसांनी म्हटलं होतं. त्याच्या मृत्यूवरून नंतर प्रचंड वादविवाद झाले. सुशांतने आत्महत्या केलेली नसून, त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोपही अनेकांनी केला होता.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!