---Advertisement---

अक्कलकोट मतदार संघातील अंगणवाड्यांसाठी १ कोटी ४९ लाखांचा निधी : आ.कल्याणशेट्टी,पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण होणार

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट, दि.२३ : अक्कलकोट तालुक्यात अंगणवाडीच्या नवीन इमारत बांधकाम व दुरुस्तीसाठी १ कोटी ४९ लाख रुपये मंजूर झाल्याची माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने हा निधी मंजूर झाला आहे. अनेक ठिकाणी अंगणवाडीच्या इमारतीचा प्रश्न होता तिथे अनेक वर्षांपासून मागणी होती.
काही ठिकाणी दुरुस्तीअभावी इमारती मोडकळीला आलेले होत्या अशा परिस्थितीत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी जिल्हा नियोजन समितीकडे निधीची मागणी केली होती.त्यानुसार जिल्हा वार्षिक योजना २०२० -२१ या योजनेअंतर्गत नवीन इमारत बांधकामास प्रशासकीय मान्यता मिळाली असून प्रत्येकी साडेआठ लाख रुपये मंजूर झाले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच दुरुस्तीच्या कामासाठी देखील एक लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.पावसाळ्यापूर्वी नवीन इमारत बांधकाम व दुरुस्तीचा विषय मार्गी लागणार असल्याचे आमदार कल्याणशेट्टी यांनी बोलताना सांगितले.

१६ अंगणवाडयाचे
होणार नवीन बांधकाम

तालुक्यातील हत्तीकणबस, चपळगाव, बोरोटी स्टेशन, तोळणुर, तडवळ, धारसंग, काळेगाव, कडबगाव, शिरवळवाडी कासेगाव, दर्गनहळळी,उळे, बोरामणी पिंजरवाडी,तीर्थ, समर्थ नगर अशा १६ अंगणवाड्यांना हा निधी मंजूर झाला आहे.ही कामे लवकरच सुरू होतील.

सचिन कल्याणशेट्टी, आमदार

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!