---Advertisement---

उत्तर प्रदेश मधील ‘त्या’ घटनेबाबत सरकार गंभीर, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे तपास सोपवण्याची शिफारस

Follow Us:
---Advertisement---

 

 

दिल्ली,दि.१० : उत्तर प्रदेश राज्यातील हाथरसमधील घडलेल्या घटनेचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्याची शिफारस उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.

या घटनेतील दोषींवर कडक कारवाई करण्यास आपले सरकार प्रयत्न करत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
या घटनेच्या तपासासाठी यापूर्वीच विशेष तपास पथकाची देखील स्थापना करण्यात आली आहे.
दरम्यान उत्तर प्रदेश गृह विभागाचे अपर सचिव अवनिष अवस्थी यांनी हाथरस येथे प्रत्यक्ष जाऊन अन्यायग्रस्त कुटुंबाची भेट घेतली आहे.त्या दरम्यान त्यांना कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. या घटनेच्या सर्व पैलूंचा तपास होईल आणि राज्य सरकार आरोपींना शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करेल,असेही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!