ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दुधनीत कोरोना चाचणीला व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १३२ जणांनी केली तपासणी, सर्व अहवाल निगेटिव्ह

गुरुषांत माशाळ,
दुधनी : “माझं दुकान माझे जवाबदारी” मााझा गाव कोरोना मुख्या गाव अंतर्गत दुधनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अतिश वाळुंज यांनी केलेल्या आवाहनानुसार कोरोना चाचणी मोहिमेला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या कोरोना चाचणी मोहीमेेत १३२ जणांंची कोरोना चााचणी करण्यात आली.

दुधनी हे मोठं व्यापारी शहर आहे. दुधनीत आडत व्यापारासह किराणा खरेदीसाठी अनेक शहरातील नागरिक दुधनीत येतात. यामुळे व्यापार्यानी स्वतःहून टेस्टिंगसाठी पुढे यावे. जितके ट्रेसिंग होतील तितके चित्र समोर येईल. जर टेस्टिंग नाही झाले तर मात्र कोरोना रुग्ण वाढत जातील. त्यामुळे टेस्टिंग वाढणे गरजेचे आहे.यासाठीच मुख्याधिकारी अतिश वाळुंज यांच्या सूचनेनंतर नगर पालिका प्रशासनाकडून तात्काळ हे काम गतीने सुरू करण्यात आले आहे.

जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संकेत दिवसेंदिवस मोठी वाढ होत असल्याने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ग्रामीण भागातील फळ विक्रेते, किरण दुकानदार आणि इतर दुकानदारांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार दुधनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अतिश वाळुंज यांनी दुकानदार आणि दुकानात काम करणाऱ्या कामगारांनी कोरोना चाचणी करावी असे आवाहन केले होते. चाचणी केलेला अहवाल दुकानाच्या दर्शनी भागात लावावे तरच दुकाने उघडण्यास परवानगी दिली जाणार, असे आदेश घंटागाडी मार्फत शहरात देण्यात आले होते.

यामुळे रविवारी सकाळी अकरा वाजता येथील मातोश्री लक्ष्मीबाई सातलिंगप्पा मेत्रे प्रशालेत व्यापाऱ्यांनी कोरोना चाचणीसाठी मोठी गर्दी केली होती. पहिल्या दिवशी दुपारी अडीच वाजेपर्यंत १३२ व्यापार्‍यांची चाचणी करण्यात आली.यामध्ये सर्व अहवाल निगेटिव्ह आढळून आले आहेत. अशी माहिती दुधनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अतिश वाळुंज यांनी “विश्व न्यूज मराठी”शी बोलताना दिली.

व्यापाऱ्यांनी आपला अहवाल दुकानाच्या दर्शनी भागात लावावे,तो अहवाल नगर परिषद मार्फत तपासला जाणार आहे.अशी माहिती देखील मुख्याधिकारी वाळुंज यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या आदेशानुसार शनिवार आणि रविवार दुकान बंद असल्याने व्यापार्‍यांनी कोरोना चाचणी साठी मोठी गर्दी केली होती.

यावेळी दुधनी प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. मंजुनाथ पाटील, रजनी बिराजदार, जय नाटकर, सुमन खंदारे, सुनील कोटनुर, दुधनी नगर परिषदचे कार्यालयीन अधीक्षक चीदानंद कोळी, कर्मचारी चन्नमल्लप्पा पाटील, रामचंद्र अत्ते, शांतलिंग चिंचोळी आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!