---Advertisement---

पावसाचा तडाखा; जयहिंद शुगर्सची साखर भिजून सुमारे दीड कोटींचे नुकसान

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.१३ : रविवारी
सायंकाळी झालेल्या चक्रीवादळ व
पावसाने आचेगाव (ता.दक्षिण सोलापूर) येथील जयहिंद शुगर्सच्या साखर गोडाऊनवरील टर्पोलिन शेड छप्पर
उडाले आहे.यामुळे गोडाऊनमधील
साखर भिजून अंदाजे दीड कोटींचे
नुकसान झाल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक मोहन पिसे
यांनी दिली आहे.

रविवारी सायंकाळी सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी चक्रीवादळ व वळवाचा पाऊस पडला.यामुळे कित्येक ठिकाणी
नुकसान झाले आहे.घटनेची माहिती समजताच तातडीने चेअरमन गणेश
माने देशमुख,मार्गदर्शक बब्रुवान माने देशमुख,व्हा.चेअरमन विक्रम पाटील
यांनी नुकसानीची पाहणी केली.व
संबधित अधिकाऱ्यांना तात्काळ
आवश्यक कार्यवाही करण्याच्या
सुचना दिल्या.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!