---Advertisement---

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडवणीस यांनी घेतली शरद पवारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे थेट शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने सर्वांचे भुवया उंचावले आहेत. मात्र ही सदिच्छा भेट होती अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सोशियल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.

सद्या राज्यात धनगर, मराठा आणि ओबीसी आरक्षणच्या मुद्द्यांवर राज्यात रणकंदन माजले आहे. त्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पवार यांच्या घरी जाऊन भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!