अक्कलकोट पत्रकार संघाचे कोवीड काळातील कार्य उल्लेखनीय,शिवसेना तालुका प्रमुख संजय देशमुख यांचे प्रतिपादन
अक्कलकोट, दि.6 : श्रीक्षेत्र अक्कलकोट शहर व तालुक्याकरिता राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे ऑक्सिजन कॉन्सट्रेटर व व्हेंटिलेटर करिता श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले आणि पत्रकार प्रविण देशमुखसह अक्कलकोट तालुका पत्रकार संघ, मुंबई मराठी पत्रकार परिषद शाखा अक्कलकोट यांनी पाठपुरावा केल्याने 5 ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मिळाले आहेत, असे प्रतिपादन शिवसेना तालुका प्रमुख संजय देशमुख यांनी केले.
ते रविवारी शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधुन एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून आलेल्या ऑक्सिजन कॉन्सट्रेटरचे पूजन अन्नछत्र मंडळातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ करण्यात आले. यावेळी संजय देशमुख हे बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते सुरेशचंद्र सुर्यवंशी हे होते.
संजय देशमुख पुढे बोलताना म्हणाले, कोरोना हद्दपार करण्यासाठी प्रशासना बरोबर पत्रकारही सतत कार्यरत आहेत. मात्र अक्कलकोटला आधुनिक यंत्रसामुग्रीची नितांत गरज असल्याने याकरिता अमोलराजे भोसले यांच्या समवेत पत्रकार संघही पाठपुरावा करुन अक्कलकोटकरांच्या सेवेत उपलब्ध करुन दिले हे उल्लेखनीय असल्याचे सांगून सध्याच्या कोवीडच्या काळात विविध मदतीची नितांत गरज आहे, भावनाशी खेळू नये, असे सांगून देशमुख यांनी पत्रकारांनी आश्वासन कसे असते हे ओळखून आधी करुन दाखविले अन् जनतेच्या सेवेर्थ दाखल झायाचे अक्कलकोट पत्रकार संघ, परिषदेच्या कार्यप्रणालीवरुन स्पष्ट होत असल्याचे सांगितले.
पत्रकार प्रविण देशमुख हे पूर्वीपासून चळवळीचे कार्यकर्ते असल्याने सर्वसामान्यांशी नाळ जोडलेले सर्वमान्यांचे नेते असल्याचे सांगून कोवीड बरोबरच श्रीक्षेत्र विकासाकरिता देखील पत्रकार पुढे यावेत असे देखील संजय देशमुख म्हणाले.
याकरिता ठाणे येथील प्रसिध्द वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेले निस्सीम स्वामीभक्त डॉ.प्रसाद प्रधान यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. आणखीन 5 ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर, व एक व्हेंटीलेटर देण्यात येणार आहेत.
यावेळी सुरेशचंद्र सुर्यवंशी, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश इंगळे, शहर प्रमुख योगेश पवार, मराठा सेवा संघाचे ता.अध्यक्ष प्रविण घाटगे, शहर अध्यक्ष मनोज गंगणे, श्री फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब निंबाळकर, अन्नछत्र मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे माजी संचालक प्रशांत भगरे, पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकुमार जगदाळे, मुंबई मराठी पत्रकार परिषद शाखा अक्कलकोटचे अध्यक्ष अरविंद पाटील, शिवा याळवार, विश्वस्त संतोष भोसले, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष मनोज निकम, पत्रकार प्रविण देशमुख, प्रा.प्रकाश सुरवसे, वैभव नवले, संजय गोंडाळ, अप्पू पराणे, मनोज इंगुले, आकाश गडकरी, शहाजी यादव, संजय गोंडाळ, निखिल पाटील, अंकुश चौगुले, हिरा बंदपट्टे, ऋषी लोणारी, महेश लिंबोळे, अमित कोळी, दयानंद नडगिरे, आकाश चौगुले, अतिश पवार, हिमेश मंजुळकर, आदित्य धोत्रे, सत्तारभाई शेख, अभिजित सुरवसे, भरत राजेगावकर, प्रसाद मोरे, निखिल तोळणुरे, प्रथमेश पवार, स्वराज्य घाटगे, वैजनाथ मुकडे, किरण शिंदे, महेश पोतदार, डॉ.बसवराज बिराजदार, चंद्रकांत सोनटक्के, फहिम पिरजादे, वैभव मोरे, मुन्ना कोल्हे, अक्षय पवार, शंकर व्हनमाने, अनिल पवार, केदार तोडकर, नितीन शिंदे, कुणाल सुर्यवंशी, नितीन मोरे, गोटू माने, सोमशंकर जमशेट्टी, विशाल कलबुर्गी, सिध्दाराम कल्याणी, सुमित कल्याणी, ज्ञानेश्वर भोसले, आतिष पवार, आबा सुर्यवंशी, रोहित खोबरे, अप्पा हंचाटे, प्रदिप बणजगोळे,संभाजी पवार, शिवसेना शहर उपप्रमुख तेजस झुंजे, प्रदीप सुरवसे, अमित थोरात, स्वामीनाथ बाबर आदीजण उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचलन प्रा.प्रकाश सुरवसे यांनी केले.
★ श्रीक्षेत्र अक्कलकोट भक्ती –
शक्तीचे स्थळ तीर्थक्षेत्र अक्कलकोट श्री स्वामी समर्थ नगरीतील कोवीड-19 च्या परिस्थितीत आवश्यक त्या यंत्र सामुग्री करिता पत्रकार संघ व परिषद यांनी मला पत्राव्दारे कळविले अन् ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर पाठवून देण्यात आले – एकनाथ शिंदे, मंत्री नगरविकास, मुंबई
★ गरज ओळखून त्वरीत मदत –
पत्रकार संघानी मला देखील पत्र दिले अन् कोवीड-19 चे अक्कलकोट तालुक्यातील मृत्यू दराचे प्रमाण कमी करण्याकरिता अत्याधुनिक यंत्राची गरज असल्याचे निवेदनाव्दारे सांगण्यात आले. त्यानुसार गरज ओळखून त्वरीत मदत करण्यात आली. ही तर श्री स्वामी समर्थांची सेवाच – खासदार श्रीकांत शिंदे, ठाणे लोकसभा