---Advertisement---

महिलांवरील अत्याचार खपवून घेतले जाणार नाही,नूतन पोलीस अधिक्षक सातपुते यांची अक्कलकोटला भेट

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट,दि.१३ : जिल्ह्यात यापुढे महिलांवरील अत्याचार खपवून घेतले जाणार नाहीत तसेच गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांकडून विशेष प्रयत्न केले जातील,अशी ग्वाही नूतन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली.

मंगळवारी, सातपुते यांनी अक्कलकोट उत्तर, दक्षिण आणि वळसंग पोलिस ठाण्याला प्रथमच भेट दिली. त्यावेळी त्या बोलत होत्या. अक्कलकोट भागामध्ये केवळ पंचवीस टक्के लोक मास्क वापरताना दिसत आहेत.
ही बाब गंभीर असून याबाबत कारवाई करावी लागेल. कोरोना च्या प्रतिबंधात्मक उपायासाठी प्रशासन अहोरात्र प्रयत्न करत आहे, अशा स्थितीत लोकांनी देखील प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे.आगामी नवरात्र उत्सवाबाबत राज्य सरकार आणि गृहविभागाने मार्गदर्शक सूचना जारी केलेले आहेत. त्यानुसारच हा उत्सव साजरा करावा लागेल. याबाबत अजिबात तडजोड होणार नाही. पोलीस प्रशासन देखील या बाबतीत सतर्क आहे मंडळाने पोलिस प्रशासनास नियमांचे पालन करून सहकार्य करावे,
असे आवाहन त्यांनी केले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड, पोलीस निरीक्षक कल्लप्पा पुजारी यांच्यासह दक्षिण,वळसंग पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!