---Advertisement---

खरे सूत्रधार सिल्व्हर ओक आणि वर्षावर बसलेत – आमदार अतुल भातखळकर

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरमधील जीपीओ चौकातील निवासस्थानी, त्या बरोबर त्यांच्या निकटवर्तीयांच्या घरावर ईडीने छापा टाकला आहे.

यासंदर्भात भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा नाव न घेता टीका केली आहे. “खरे सूत्रधार सिल्वर ओक आणि वर्षावर बसलेत” असा आरोप भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.

सिल्वर ओक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बंगल्याचं नाव आहे तर वर्षा ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बंगल्याचे नाव आहे त्यामुळे भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरच आरोप केले आहेत.

१६ जूनला ईडीच्या तीन पथकांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित दोन सीए व एका कोळसा व्यापाराच्या घरावर छापे टाकले होते. ईडी देशमुख यांच्याकडेही झाडाझडती घेण्याची शक्यता या छाप्यामुळे बळावली होती. अवघ्या नऊ दिवसात ईडीने हा छापा टाकला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!