---Advertisement---

१६ वर्षीय मुलीवर चौघांनी केला सामुहिक अत्याचार ; राज्यात उडाली खळबळ

By team
On: September 27, 2024 10:09 AM
Follow Us:
---Advertisement---

पुणे : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक शहरात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना घडत असतांना नुकतेच पुण्यातील उच्चभ्रू परिसर समजल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्क परिसरात एका १६ वर्षीय मुलीवर ओळखीच्या ४ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच मुलीचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर प्रसारित करून बदनामी करण्यात आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीने दोन सज्ञान आणि दोन अल्पवयीन आरोपींविरोधात कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. स्वप्निल गाडेकर (२० ) आणि ओम घोलप (२०, रा. धनकवडी , पुणे ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच १६ वर्षे २ विधिसंघर्षग्रस्त बालकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल २०२४ ते १२ सप्टेंबरपर्यंत आरोपी स्वप्निल गाडेकर, ओम घोलप आणि २ अल्पवयीन मुलांनी मुलीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. स्वप्निल गाडेकर, ओम घोलप, एक अल्पवयीन आरोपी यांनी घटनेचे व्हिडिओ काढून तसेच दुसऱ्या अल्पवयीन मुलाने पीडित मुलीचे अर्धनग्न फोटो तसेच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याशी वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी वारंवार अत्याचार केले. मुलीचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे अनोळख्या लाेकांनी तिला मेसेज व शारीरिक सुखाची मागणी केल्याचे मुलीने तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिस तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!