---Advertisement---

सोन्यासह चांदीच्या दरात मोठी वाढ

By team
On: June 16, 2024 9:41 AM
Follow Us:
---Advertisement---

जळगाव : वृत्तसंस्था

चांदीच्या भावातील चढ- उतार सुरूच असून शनिवार, १५ जून रोजी त्यात, ७०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदी ८९ हजार २०० रुपये प्रती किलोवर पोहचली आहे. सोन्याच्याही भावात ४०० रुपयांची वाढ होऊन ते ७२ हजार ४०० रुपये प्रती तोळ्यावर पोहचले आहे.

गेल्या काही दिवसांपासून चांदीच्या भावात सतत चढ-उतार होत आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत चांदीच्या भावात मोठी घट झाली. त्यात शुक्रवार, १४ जून रोजी ८०० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे चांदी ८८ हजार ५०० रुपये प्रती किलोवर आली होती. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी मात्र चांदीत ७०० रुपयांची वाढ होऊन ती ८९ हजार २०० रुपयांवर पोहचली. तीन दिवस स्थिर असलेल्या सोन्याच्या भावात शनिवार, १५ जून रोजी ४०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सोने ७२ हजार ४०० रुपये प्रती तोळ्यावर पोहचले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!