---Advertisement---

रुद्रप्रयागमध्ये १८ प्रवाशांनी भरलेली बस नदीत कोसळली !

By team
On: June 26, 2025 10:37 AM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशातील उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग याठिकाणी भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. याठिकाणी प्रवाशांनी भरलेली बस अनियंत्रित होऊन घोलथीर परिसरात अलकनंदा नदीत कोसळली. अपघातादरम्यान सुमारे चार-पाच जण बसमधून बाहेर पडले. यानंतर संपूर्ण परिसरात गोंधळ उडाला. या बसमध्ये सुमारे १८-२० प्रवासी होते, त्यापैकी आठ जणांना वाचवण्यात आले आहे, तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. बचाव पथक घटनास्थळी मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात बद्रीनाथ महामार्गावर घडला, ज्याठिकाणी घोलथीरजवळ बस अनियंत्रित होऊन अलकनंदा नदीत पडली. अपघातावेळी बसमध्ये प्रवासी देखील होते. बस टेकडीवरून खाली कोसळली आणि थेट अलकनंदा नदीत पडली. खराब हवामान आणि डोंगरात पावसामुळे नदीचा प्रवाह खूप वेगवान होता. अपघातादरम्यान, सुमारे चार-पाच जण बसमधून बाहेर पडले आणि टेकड्यांवर अडकले. या लोकांना शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच एसडीआरएफची टीम बचावकार्यासाठी पोहोचली. सुरक्षा यंत्रणाही घटनास्थळी उपस्थित आहेत. मदत आणि बचावकार्य वेगाने सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत आठ जणांना बाहेर काढण्यात आले आहे, तर एकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. नदीच्या जलद प्रवाहामुळे बचावकार्यात अनेक अडचणी येत आहेत. घटनास्थळी मोठ्या संख्येने लोकही जमले आहेत.

पावसामुळे अलकनंदा नदीत जोरदार प्रवाह होता, त्यामुळे प्रवासी नदीत वाहून जाण्याची शक्यता आहे. या बस अपघाताची माहिती देताना उत्तराखंड पोलिस मुख्यालयाचे प्रवक्ते आयजी नीलेश आनंद भरणे म्हणाले की, “रुद्रप्रयाग जिल्ह्यातील घोलतीर भागात एक बस अनियंत्रित होऊन अलकनंदा नदीत पडली. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये १८ जण होते. बचावकार्य सुरू आहे.”

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!