---Advertisement---

दुधनी रेल्वे स्थानकाजवळील किराणा दुकानाला भीषण आग ; लाखोंचे साहित्य जळून खाक

By team
On: June 23, 2024 10:05 AM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

दुधनी येथील रेल्वे स्टेशन परीसरात भिमाशंकर कल्याणशेट्टी यांच्या मालकीचे किराणा दुकान असून रोजच्या प्रमाणे रात्री दुकानात सामान व्यवस्थित ठेऊन लाईट बंद करून कुलुप लाऊन घरी गेले होते. मध्यरात्री सुमारे एक ते दोन दरम्यान दरम्यान दुकानात आग लागली होती . त्याच वेळेस दुकानाच्या बाजुस माजी नगरसेवक सोमण्णा ठक्का हे शौचालयास उठले होते. आणि त्याच दरम्यान हैद्राबाद एक्सप्रेस दुधनी रेल्वे स्थानकावरून जात असताना प्रवाशांनी आरडा ओरड केल्याने नागरीक जागे झाले.

तो पर्यंत आग मोठया प्रमाणात लागली होती. अथक तीन तासाच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यात आले .अनिशमन केंद्र सोलापूर यांना आगीची माहिती देण्यात आली . मात्र अग्निशमन गाडी काही आली नाही . या घटनेत किराणा मालकाचे सुमारे सहा ते सात लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!