---Advertisement---

आ.राणेंची वादात उडी : उद्धव ठाकरे अंतर्वस्त्राचे पैसेही स्वतः देत नाहीत !

By team
On: February 24, 2025 5:06 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील शिंदे गटाच्या नेत्या आणि उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या मर्सिडीझबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना ठाकरे गट आक्रमक झाला असून नीलम गोऱ्हेंवर टीका केली जात आहे. या सर्व प्रकरणात भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी नीलम गोऱ्हे यांची बाजू घेतली आहे. नीलम गोऱ्हे जे काही बोलल्या, ते योग्य असल्याचे नीतेश राणे म्हणाले. उद्धव ठाकरे अंतर्वस्त्राचे पैसेही स्वतः देत नाहीत. त्यांचे कुटुंबीय आजपर्यंत स्वत:च्या पैशाने जेवलेले नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

उद्धव सेनेत 2 मर्सिडीझ दिल्या, तर एक पद मिळते, असा आरोप त्यांनी केला होता. त्यांच्या वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. ठाकरे गट आक्रमक झाला असून नीलम गोऱ्हे यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी तर थेट अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे सांगितले. नीलम गोऱ्हे पक्षातून जाताना घाण करून गेल्या, अशा शब्दात संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. या सर्व प्रकरणावर बोलताना नीतेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली.

काय म्हणाले नीतेश राणे? नीतेश राणे यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत नीलम गोऱ्हे आणि संजय राऊतांच्या विधानाबाबत भाष्य केले. आजपर्यंत आलेल्या अनुभवाने मी सांगतो. आमचे वडील 39 वर्षे शिवसेनेत होते. उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय आजपर्यंत स्वत:च्या पैशाने जेवलेले देखील नाहीत. हॉटेलचे बीलही ते देत नाही. घरातला एसीही व्हिडिओकॉनचा लावला होता. त्यामुळेच राजकुमार धूत यांना खासदारकी दिली होती, असा दावा नीतेश राणे यांनी केला. बाहेरगावचे तिकीट किंवा अंतर्वस्त्राचे पैसेही ते स्वत: देत नाही. तुम्हाला मी दुकानाचे नावही देऊ शकतो, असेही नीतेश राणे म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!