---Advertisement---

एस.टी.आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी आ.सचिन कल्याणशेट्टी यांचे धनगर समाज बांधवांना लेखी आश्वासन

By team
On: September 23, 2024 8:44 AM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : प्रतिनिधी 

सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रविवारी प्रत्येक विधानसभेचे आमदार यांच्या घराला घेराव घालून त्यांचे धनगर समाजाचा एस. टी. प्रवर्गात समावेश करुन त्याची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांची भुमिका काय आहे यासाठी सकल धनगर समाज बांधव यांच्या वतीने अक्कलकोटचे तालुक्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या कार्यालयाला घेराव घालून धनगरी ढोल वाजवून घोषणा देण्यात आल्या.

यावेळी धनगर समाज बांधव सरकारच्या विरोधात घोषणा दिले. आमदार कल्याणशेट्टी हे कार्यालयात आले असता धनगर समाज बांधवांनी त्यांना निवेदन दिले. त्यावेळी आमदार कल्याणशेट्टी यांनी सकल धनगर समाज बांधवांच्या शिष्टमंडळाला बोलताना सांगितले की धनगर समाजाचा एस. टी. प्रवर्गात समावेश करुन त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांना याबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. मी सदैव धनगर समाजाच्या पाठीशी असल्याचे कल्याणशेट्टी यांनी सांगितले.

यावेळी धनगर समाजाचे नेते सुनील बंडगर, दत्तात्रय हिळ्ळी, अनिल बर्वे, सुभाष पुजारी, शंकर व्हनमाने, दत्तात्रय माडकर, सुर्यकांत बाचके, स्वामीराव घोडके, संतोष शिंदे, बिरु माने, भुताळी वागदरी, काशिनाथ निंबाळ, रेवणसिध्द शेरी, निलेश लवटे, सोमनाथ घोडके, गंगाधर म्हेञे, बिरप्पा मैंदर्गी, विजय धर्मसाले यांच्या सह आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!