---Advertisement---

आ.शिरसाट यांच्या परिवाराच्या गाडीवर दगडफेक

By team
On: July 8, 2024 10:04 AM
Follow Us:
---Advertisement---

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था

राज्याच्या राजकारणात सत्ताधारी व विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सुरु असतांना दि.७ जुलै रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजी नगरातील बाबा पेट्रोल पंपाजवळील (महावीर चौक) कामगार कार्यालयासमोर आमदार संजय शिरसाट यांच्या कुटुंबीयांच्या गाडीवर दगड फेकल्याचा प्रकार घडला आहे. या वेळी शिरसाट यांच्या पत्नी, कन्या व मुलगा गाडीत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

शिरसाट यांचे कुटुंबीय जात असताना त्यांना रस्त्याच्या कडेला भांडणे सुरू असल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी गाडी थांबवली. तेवढ्यात बाजूने जाणाऱ्या दुचाकीस्वाराने दुचाकी थांबवून शिरसाट यांच्या कुटुंबीयांच्या गाडीवर दगड फेकला. त्यामुळे चालक आणि कुटुंबीय खाली उतरले. त्या वेळी तो दुचाकीस्वार पळून गेला. गाडीला धक्का लागल्याने थोडा गोंधळ झाला, असे आमदार शिरसाट यांच्या कन्या हर्षदा यांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शिवसेनेचे कार्यकर्तेदेखील घटनास्थळी पोहोचले. रात्री उशिरापर्यंत या भागातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्याचे काम सुरू होते. आमदार शिरसाट यांच्या गाडीवर रविवारी रात्री महावीर चौक परिसरात दगडफेक करण्यात आली. त्यानंतर तेथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!