---Advertisement---

अग्निहोत्रातून खऱ्या अर्थाने विश्वशांतीचा संदेश

By team
On: August 1, 2025 3:12 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि. ३१ : प्रतिनिधी

अग्निहोत्र हे केवळ अनुष्ठान नसून, ते विश्वशांतीचा संदेश देणारे आणि मानवी जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे एक प्रभावी माध्यम आहे. अक्कलकोटसारख्या अध्यात्मिक नगरीतून अशा उपक्रमांचा प्रचार आणि प्रसार अधिक मोठ्या प्रमाणावर व्हावा, असे मत राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केले.

गुरुवारी,त्या शिवपुरी येथील आश्रमास भेट देण्यासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांनी आश्रमातील विविध उपक्रमांची माहिती घेतली, विशेषतः अग्निहोत्राच्या प्रयोगाबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. अग्निहोत्र केव्हा करावे, कसे करावे, याचे फायदे काय आहेत. यासंबंधी त्यांनी जागरूकता दाखवत,हा केवळ सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी केला जाणारा विधी नाही, तर मानसिक समाधान आणि पर्यावरण रक्षणाचेही प्रभावी साधन आहेत,
असे नमूद केले.

यावेळी शिवपुरी विश्व फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले आणि डॉ. गिरीजा राजीमवाले यांनी राज्यमंत्री मिसाळ यांचे तसेच त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत केले. त्यांनी फाउंडेशनच्या उपक्रमांबाबत सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाची सुरुवात राज्यमंत्री मिसाळ यांच्या हस्ते व्याहूर्थी होमाने झाली. त्यानंतर गजानन महाराज यांच्या पादुकांचे दर्शन घेण्यात आले, तसेच श्रावणमासानिमित्त शिवमंदिरात दर्शन घेतले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी यांची उपस्थिती होती.कार्यक्रमानंतर डॉ. राजीमवाले यांनी राज्यमंत्री मिसाळ यांचा सत्कार केला. यावेळी भाजपा शहर मंडल अध्यक्ष प्रदीप पाटील, मोहन डांगरे, आणा वाले, सृष्टी डांगरे,भाजपचे माजी शहराध्यक्ष शिवशरण जोजन, नन्नू कोरबू, डॉ.गणेश थिटे, धनंजय वाळुंजकर, परमेश्वर माळी, विनोद मोरे यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी
उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!