ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षानं केला भाजपचा सुपडा साफ, आपच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे वाटून व्यक्त केला आनंद

दिल्ली : दिल्ली महापालिका निवडणुकीची मतमोजणी पूर्ण होत आली असून सत्तेचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. भाजपची १५ वर्षांची सत्ता उलथून टाकत आम आदमी पक्षानं प्रथमच दिल्ली महापालिका जिंकली आहे. महापालिकेच्या २५० जागांपैकी सर्वाधिक १३५ जागांवर सध्या आम आदमी पक्ष आघाडीवर आहे. त्यामुळं दिल्लीत ‘आप’चा महापौर बसणार हे स्पष्ट झालं आहे.

दिल्लीसह संपूर्ण देशातीचे लक्ष लागलेल्या दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाने स्पष्ट बहुमतासह विजय मिळवला आहे. मतमोजणीच्या सुरुवातीपासून ही लढत अगदी अटीतटीची सुरू होती. या निवडणुकीत मतमोजणीच्या उत्तरार्धात आम आदमी पक्षाने आघाडी मिळवली आणि ती अखेरपर्यंत टिकवली.

काँग्रेसला केवळ ९ जागांवर विजय मिळाला. तर अपक्ष आणि इतरांच्या खात्यामध्ये केवळ ३ जागा गेल्या आहेत. दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाला ४२.५ टक्के मते मिळाली. तर त्याखालोखाल दुसऱ्या क्रमांकाची मते भाजपाला मिळाली आहेत. मात्र, एक्झिट पोलमध्ये वर्तवलेल्या अंदाजानुसार पूर्णपणे पानीपत झाले नाही एवढीच भाजपासाठी जमेची बाजू ठरली आहे.

दिल्ली महापालिकेत २००७ पासून भाजपाची सत्ता होती. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाने २७० पैकी १८१ जागा जिंकल्या होत्या. तर आपने ४८ आणि काँग्रेसने ३० जागांवर विजय मिळवला होता. दरम्यान, या वर्षीच्या सुरुवातीला केंद्र सरकारने दिल्लीतील तीनही महानगरपालिकांचे एकत्रीकरण करून एकच महानगरपालिका स्थापन केली होती. तसेच, वॉर्डची संख्या घटून २५० एवढी झाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!