---Advertisement---

अभिनेत्री मायरा मिश्राने मोबाईलमधून राज्यपालांच्या खूर्ची मागे उभ राहुन काढले फोटो, मायरा मिश्रावर कारवाई करण्याची मागणी

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे सातत्याने वादात अडकत आहेत. आता कोश्यारी एका मॉडेलमुळे पुन्हा अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राजभवनातले मॉडेलचे फोटो समोर आले आहेत. मायरा मिश्रा या मॉडेलने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी तिने कोश्यारी यांच्यासह खुर्चीसोबत आणि राजभवनात इतर ठिकाणी फोटो काढले. हे फोटो तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.

त्यावरून मनसेने आक्षेप घेतला आहे. मनसे नेते मनोज चव्हाण यांनी याविषयी ट्वीट केले आहे. आपल्या ट्वीटसोबत त्यांनी मायरा मिश्राचा फोटो शेअर केला आहे. या ट्वीटमध्ये चव्हाण म्हणतात, ठिकाण राजभवन – ही बाई कोण आहे? अभिनेत्री आणि मॉडेल राजभवनात काय करतेय? राज्यपालांच्या खुर्चीला मान सन्मान आहे की नाही? या ट्वीटनंतर आता नवा वाद निर्माण झाला आहे.

मुंबईतील राजभवन हे महाराष्ट्राच्या राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान आहे. सध्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. एका एनजीओच्या काही महिला राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनात आल्या होत्या. संबंधित महिला निमंत्रित होत्या. या महिलांबरोबर अभिनेत्री मायरा मिश्रा ही देखील आली होती. राज्यपालांच्या दालनात मोबाईल फोन वापरण्यास परवानगी नसताना देखिल नियमांचे उल्लंघन करुन अभिनेत्री मायरा मिश्राने फोटो काढला. राज्यपाल दालनात येण्याआधी मायरा मिश्राने मोबाईलमधून राज्यपालांच्या खूर्ची मागे उभ राहुन काही फोटो काढले. त्यानंतर ते फोटो तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हायरल केले.

तिच्या ह्या व्हायरल फोटोशूटमूळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. राज्यपाल हे संविधानिक पद आहे. राजभवनात असे फोटो काढुन राजभवनाचा अपमान केला आहे. फोनचा वापर करण्यास परवानगी नसताना देखिल असा पोरकटपणा करुन फोटो काढल्याने राजभवनाची प्रतिमा मलिन होत असल्याचे तेथील काही वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितलं. मायरा मिश्राच्या या बालिश वृतीवर सर्वत्र निषेध केला जात असून लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!