---Advertisement---

शिवीगाळ भोवली : अंबादास दानवेंचं ५ दिवसांसाठी निलंबन

By team
On: July 2, 2024 2:32 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात सरकारचे पावसाळी अधिवेशन सुरु असून विधानपरिषदेत आपल्या दिशेने हातवारे केले म्हणून संतप्त झालेले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवारी भाजपा सदस्य प्रसाद लाड यांना शिवी हासडली होती. त्यांच्या वक्तव्यावरून आजही सभागृहात गदारोळ झाला. दानवे यांचे निलंबन करावे, अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली. यानंतर उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी दानवे यांचे पाच दिवसांसाठी निलंबन केले आहे.

शिवीगाळ प्रकणावरून गदारोळ झाल्याने उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी सोमवारी सभागृहातील कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले होते. आजही सभागृहात या प्रकरणावरून गदारोळ झाला. दानवे यांचे निलंबन करावे, अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली. यानंतर उपसभापती गो-हे यांनी दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबीत केले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!