---Advertisement---

लाचलुचपत विभागाची कारवाई : वकिलाने लाच घेताच केली अटक !

By team
On: December 12, 2023 9:26 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

२० हजार रुपयांची लाच स्वीकारताना दयानंद मल्लिकार्जुन माळी (रा. माळी वस्ती, सोरेगाव, विजापूर रोड, सोलापूर) या खासगी वकिलास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी, पोलीस अंमलदारद्वय सोनवणे, पकाले, हाटखिळे, किनगी, सुरवसे आदींनी ही कामगिरी पार पाडली.

मिळालेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार यांचेविरुध्द सहनिबंधक को-ऑप सोसायटी, पुणे यांचे न्यायालयात सावकारी अपील केसची सुनावणी चालु आहे. सदर केसचा निकाल तक्रारदार यांच्याबाजूने लावण्यासाठी, निकालपत्रासाठी सहनिबंधक को ऑप सोसायटी पुणे येथील क्लार्क यांना ५० हजार रुपये द्यावे लागतील असे सांगुन दयानंद माळी यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आलेल्या तक्रारीनुसार पंचासमक्ष पडताळणी केली असता यापूर्वी घेतलेले ५ हजार रुपये वजा करून उर्वरित ४५ हजार रुपयांची लाचेची मागणी करून त्यातील दुसरा हप्ता २० हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले आहे. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!